प्लॉटच्या कारणावरून बेदम मारहाण.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :स्टेशन रोडवरील हॉटेल फरहतच्या पाठीमागील बाजूस घराशेजारील प्लॉट मोकळा करून दे असे म्हणत चौघा जणांनी एका ५७ वर्षीच्या व्यक्ती व त्याच्या भावास लाथाबुक्क्याने मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना बुधवारी (दि. २०) सकाळी ११ च्या सुमारास घडली. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बकार अहमद रशिद शेख (रा. हॉटेल फरहतमागे, स्टेशन रोड) हे त्यांच्या घरी असताना नादीर शेख (रा. गोविंदपूरा, नगर) व त्याच्यासोबत अन्य तीन अनोळखी इसमांनी बकार शेख यांना घरात घुसून तुझ्या घराशेजारील प्लॉट मोकळा करून दे असे म्हणत त्यांना व त्यांच्या भावांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
तसेच तलवारीने तुकडे करून जिवे मारण्याची धमकी दिली.या प्रकरणी बकार शेख यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पो. ना. सलिम शेख हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.