विवाहितेची डोंगराच्या कडयाहून दरीत उडी मारून आत्महत्या.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शिर्डी येथील विवाहिताने नगर तालुक्यातील मांजरसुंबा डोंगराच्या कडयाहून दरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.१९) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. 
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिर्डीच्या विवाहिता स्वाती मंगेश बंडगे (वय २०) यांचे माहेर मांजरसुंबा असून त्या माहेरी आल्या असता मंगळवारी सकाळी १० वाजता त्या मांजरसुंबा गडावर आल्या. गडावर आल्यावर डोंगराच्या टोकाजवळ जावून त्या उभ्या राहिल्या. त्यांच्या संशयास्पद हालचालींमुळे तेथील ग्रामस्थांनी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पो.नि. विनोद चव्हाण यांना याबाबत माहिती दिली.

 श्री. चव्हाण यांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी मोठा जमाव जमा झाला व स्वाती यांना खाली येण्याची विनंती सर्वांनी केली. मात्र पुढे येणाऱ्यांना त्यांनी आत्महत्येची धमकी दिली. बराच वेळ हा प्रकार सुरू होता. श्री. चव्हाण यांनी दरीच्या उलट दिशेने वर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र स्वातीने त्यांच्यावर दगडांचा मारा केला. यामध्ये श्री. चव्हाण हे जखमी झाले. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
अखेर दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास स्वाती हिने दरीत उडी मारली. दरीतून तिला बाहेर काढून जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र यामध्ये गंभीर जखमी झाल्यामुळे उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.