सेंट सेव्हिअर्स व मिरीच्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व ब्लँकेटचे वाटप

सेवाप्रीत फाऊंडेशनने ख्रिसमस सणाच्या पार्श्‍वभुमीवर वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी ख्रिसमस धमाल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तारकुर येथील सेंट सेव्हिअर्स शाळेत झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी विविध मनोरंजन खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम व विविध स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच फाऊंडेशनच्या वतीने सेंट सेव्हिअर्स व मिरीच्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांना सांताक्लॉजच्या हस्ते शैक्षणिक साहित्य व ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. सांताक्लॉजच्या रुपात आलेल्या सेवाप्रीतच्या सदस्यांमुळे वसतीगृहातील विद्यार्थ्यांचा ख्रिसमस सणाचा आनंद द्विगुणीत झाला.


कार्यक्रमाची सुरुवात पास्टर रेव्ह.पीटर वरा यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून कुंदा हालबे, सुशीला मोडक, मुख्यध्यापिका ज्योत्सना शिंदे, फाऊंडेशनच्या अध्यक्षा जागृती ओबेरॉय, निशा धुप्पड, दिशा ओबेरॉय, नताशा धुप्पड, अर्चना ओबेरॉय, गीता धुप्पड, अंशु कंत्रोड, सीमा जग्गी, रिटा बक्षी, डॉ.सोनाली वहाडणे आदि उपस्थित होत्या.
सांताक्लॉजने वसतीगृहातील विद्यार्थ्यांना विविध आकर्षक भेटवस्तू, चॉकलेटचे वाटप केले. कार्यक्रम स्थळी ख्रिसमस ट्री व फुग्यांची सजावट करण्यात आली होती. केक कापून ख्रिसमसचा आनंदोत्सव साजरा करीत, विद्यार्थ्यांसह सेवाप्रीतच्या सदस्यांनी गाण्यावर ठेका धरला. 

या कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला. प्रास्ताविकात जागृती ओबेरॉय यांनी वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी फाऊंडेशनच्या वतीने राबविण्यात येणार्‍या विविध सामाजिक उपक्रमाची माहिती दिली. निशा धुप्पड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन ख्रिसमस सणाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या विविध मनोरंजनात्म खेळ, स्पर्धेचे सांताक्लॉजच्या हस्ते बक्षिसांचे वाटप करण्यात आले. प्राची धुप्पड या विद्यार्थिनीने सांताक्लॉजची वेशभुषा परिधान केली होती. 

या कार्यक्रमासाठी कशीश जग्गी, अर्चना खंडेलवाल, मीना सुद, सुमन कपुर, शिल्पा सबलोक, हर्षा हिरनंदानी, अन्नू थापर, लता रजोरी आदि उपस्थित होत्या. सण साजरा होत असताना आपल्या जवळील व्यक्ती या आनंदा पासून वंचित राहू नये यासाठी सेवाप्रीतच्या वतीने महिलांनी घेतलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगत रेव्ह.पीटर वरा यांनी फाऊंडेशनचे आभार मानले. प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली.
Powered by Blogger.