राजाभाऊंचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आ.मोनिका राजळे होणार सक्रिय.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :आमदार मोनिका राजळे यांनी राजकारण व समाजकारणात सक्रिय सहभागी होवून, पती विरहाचे दु:ख विसरुन तालुक्यातील जनतेला बळ द्या. तुमच्या नेतृत्वाची शेवगाव व पाथर्डी तालुक्याला गरज आहे. आम्ही सर्व पदाधिकारी तुमच्या सोबत आहोत. उमेद कार्डामधून व्यक्त केलेले संदेश हे काळजाला भिडनारे आहेत. तुमचे नेतृत्व हे सर्वव्यापी झाले आहे. तुमच्यामध्ये आम्ही राजाभाऊंना पहात आहोत. त्यामुळेच कार्यकर्त्यांच्या वतीने दि.५ ते १२ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या विविध कार्यक्रमांना आपन उपस्थित रहावे, असे साकडे घालत आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर करत सकारात्मक मान डोलावत आ. मोनिकांनी होकार दिला. त्यामुळे मोनिका राजळे दि. ५ डिसेंबर पासून राजकारण व समाजकारणात सहभागी होण्याचे संकेत आहेत.

--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
विविध संस्थाच्या पदाधिकाऱ्यांनी कासारपिंपळगांवला जावून आ. मोनिका राजळेंची भेट घेतली. यावेळी नगराध्यक्ष डॉ. मृत्यूंजय गर्जे, उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर, जि.प. सदस्य सोमनाथ खेडकर, संघाचे व्हा. चेअरमन उत्मराव गर्जे, बाजार समितीचे कुंडलिक आव्हाड, विजयकुमार लुनावत, मधुकर काटे, पं.स.चे उपसभापती विष्णूपंत अकोलकर, सदस्य सुनील ओव्हळ, रवींद्र वायकर, एकनाथ हाटकर, सुनिल ओव्हळ, संदीप देशमुख, युवा कार्यकर्ते पुरोषत्तम आठरे, पं.स. सदस्य सुभाष केकाण, माजी सभापती काकासाहेब शिंदे, नगरसेवक नामदेव लबडे, रमेश गोरे, मंगल कोकाटे, उपस्थित होते.

आ. राजळे यांच्याशी भावनीक संवाद साधतांना अनेकांचे डोळे पाणावले. ताई तुमच्यात आम्ही भाऊ पहातोत. आम्ही तुमच्या बरोबर तुमचे भाऊ म्हणून खंबीरपणे उभे राहू. राजाभाऊंचे अधुरे स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचे आहे. भाऊंनी आम्हाला राजकारणात सर्व काही दिले आहे. आम्हाला कोणत्याही अपेक्षा नाहीत. महिला म्हणून तुमचे मन मोठे आहे. तुम्हीच सर्व काही सहन करु शकता. तुमचे आभाळाएवढे दु:ख कमी करण्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत. मात्र या तालुक्यातील जनतेच्या तुम्ही आई बनून तुम्ही सक्रियपणे बाहेर पडा.

दि. ५ डिसेंबर रोजी राजीव राजळे यांची जयंती ते दि. १२ डिसेंबर रोजी स्व. गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे. या कालावधीत हिम्मत सप्ताह आयोजीत करुन दि. ५ रोजी सारेगमपा अंजली व नंदीनी गायकवाड यांचा भावसंध्या तर दिवसभर रक्तादान शिबीर, पालीकेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार,स्वच्छ भारत सव्र्हेक्षण शुभारंभ आयोजीत केला आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड उपस्थित रहानार आहेत.

दि. १० रोजी हसत खेळत घरगुती वैद्यकीय सल्ला देणारे डॉ. स्वागत तोडकर यांचे व्याख्यान आयोजीत केले आहे. दि. १२ रोजी गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने सुरु होणाऱ्या सुमारे साडेचार कोटी रुपयाच्या जॉगींग पार्कचे भुमिपूजन आ. राजळेंच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर चारचाकी वाहनाच्या रॅलीने गोपीनाथ गडावर गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचे दर्शन घेवून हिम्मत सप्ताहाचा समारोप होणार आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.