ब्लॉग - कर्डिलेंचे बोल अन् विखेंचे उत्तर सडेतोड

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :उगवत्या सूर्याला कोणीही नमस्कार करतो, पण मावळत्याला लवकर करत नाही, असे म्हटले जाते. तशीच परिस्थिती आज राजकीय पक्षांमध्ये झालेली आहे. भाजपा सरकार सत्तेत आल्यानंतर भाजपामध्ये जाणार्‍यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, शिवसेना आदी पक्षातील अनेक मातब्बर आता भाजपात दाखल होऊ लागलेले आहे. भाजपात गेल्यानंतर त्याची काय अवस्था होते, हे त्यांना माहिती आहे, त्यावर भाष्य करून उपयोग नाही. जो जाहीर तोच पाहिल, असेच यावर म्हटलेले उचित ठरेल.विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे भाजपात जाणार अशा वावड्या जिल्ह्यात अनेकदा उठल्या. पण त्यात तथ्त काहीच नव्हते. ना. विखे भाजपात जाणार हे वादळ मात्र कायमच उठत होते. क्षमत होते. विखेंनी भाजपामध्ये जावे, असे काँग्रेसच्या काही नेत्यांना वाटत आहे. कारण विखेंमुळे त्यांचे पक्षातील स्थान कायमच अडचणीत आलेले आहेत. त्यामुळे विखे काँग्रेस नको, असा म्हणणारा एक गट आहे.
 
ना. विखेंचे भाजपात जाण्याच्या चर्चेचे गुर्‍हाळ थांबले होते. परंतु या चर्चेच्या गुर्‍हाळाला पुन्हा आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी डॉ. तनपुरे साखर कारखान्याच्या 58 व्या गळीत हंगामाच्या कार्यक्रमात दिली. आ. कर्डिले यांनी डॉ. सुजय विखे यांनी लवकर आमच्या पक्षात यावे म्हणजे पुढील राजकारण सोपे होईल, असे वक्तव्य केले. या वक्तव्याने काही वेळाचा हशा झाला. 

परंतु त्याचे आ. कर्डिले व ना. विखे यांच्या राजकारणावर परिणाम करणारे आहे. दक्षिण लोकसभा मतदार संघातून डॉ. सुजय विखे यांनी निवडणूक लढवावी, अशी विखे समर्थकांनी अपेक्षा आहे. तशी व्यूरचनाही आखली जात आहे. पण नेमके कोणत्या तिकिटावर ते निवडणूक लढविणार असाही प्रश्‍न निर्माण होत आहे. 

विखे घराण्याला दक्षिण मतदार संघ तसा परिचित आहे. स्व. पद्मभूषण बाळासाहेब विखे यांनी याच मतदार संघातून निवडणूक लढविलेली असून त्यांचे कार्यकर्त्यांचे जाळे या भागात मोठे आहे. त्यानंतर ना. राधाकृष्ण विखे यांनी उत्तर व दक्षिण लोकसभा मतदार संघावर आपली कमांड चांगली निर्माण केलेली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक लढविणे तसे डॉ. सुजय विखे यांना सोपे ठरणार आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
हाच मुद्दा लक्षात घेऊन आ. कर्डिले यांनी विखे यांना भाजपात येण्याचे निमंत्रण दिलेले आहे. परंतु आगामी काळात होणारे दुष्परिणाम लक्षात घेत ना. विखे यांनी याच सभेत आपण काँग्रेसमध्ये राहणार असल्याचे स्पष्ट करून आ. कर्डिले यांचे निमत्रण धुडकावले.

भाजपामध्ये गेलेल्या अनेक मान्यवरांची अवस्था कशी याच भाजपामध्ये गेलेले व भाजपाच्या तिकिटावर निवडून आलेले खासदार नाना पटोले यांनी पक्षंतर्गत गटबाजी व विकास कामे होत नसल्याने व्यक्ती स्वातंत्र्य नसल्याने आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन पक्षाच्या बाहेर पडलेले आहे. यावरून भाजपामध्ये गेलेल्यांची अवस्था आहे, हे ना. विखे यांनी यावेळी लगेच स्पष्ट केलेले असल्याने भाजपातील नेत्यांची अवस्था कशी हे आता सगळ्यांसमोर आलेले आहे.

तुम्ही तुमच्या पक्षात राहून कामे करा, आम्ही आमच्या पक्षात राहूनच कामे करतो, असे सांगून एक प्रकारे आ. कर्डिले यांना तुमचे तुमच्या पक्षात कामे होत नाहीत. त्यामुळे तुम्हीच आमच्या पक्षात या, असे म्हणून त्यांनाच प्रतिनिमंत्रण दिलेले आहे. 

डॉ. सुजय विखे यांनी राजकारणात आपली छाप निर्माण केलेली आहे. डॉ. विखे यांच्या नेतृत्वाखाली गणेश, राहुरी कारखान्याच्या निवडणुका झालेल्या असून त्यात त्यांना भरघोस यश मिळालेले आहे. राहाता नगरपालिका व शिर्डी नगर पंचायत निवडणुकाही डॉ. विखे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आहेत. त्यामध्ये राहात्यात त्यांना फारसे यश मिळालेले नसले तरी त्यांचे नियोजन पहाता, ते आगामी निवडणुका यशस्वीपणे हाताळू शकतात, हे यातून स्पष्ट झालेले आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
डॉ. विखे यांनी राजकीय बांधणी उत्कृष्ट असल्याने त्यांनीच दक्षिण लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवावी, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. त्यांच्या अभ्यासूपणामुळे त्यांना आता भाजपाचे नेते त्यांच्यासाठी दार उघडे करत आहे. डॉ. विखे यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नसली तरी आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये ते दक्षिण लोकसभेतून निवडणूक लढवू शकतात, हे तितकेच खरे. 

कोणत्या पक्षाकडून अद्याप स्पष्ट नसले तरी आगामी काळात ते उघड होणार आहे. यामुळे दक्षिणतेली रंगत यावेळी चांगलीच होणार आहे. डॉ. विखे विरोधात कोण असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. दिल्ली अबी तो बहूत दूर है मगर विखेंची दिल्लीकडील कूच सगळ्यांना विचार करायला लावणारी आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.