सोशल मिडिया - तर साधा कार्यकर्ताही होईल अहमदनगरचा महापौर !

राहुल सीताराम ठाणगे - राज्यातील क आणि ड वर्गामधील महानगरपालिकांचे महापौर थेट जनतेतून निवडण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. त्यामुळेच आता आपल्या नगरसारख्या ड वर्गात मोडणार्या महानगरपालिकेच्या निवडणुकीची चर्चाही सुरू झालेली आहे. याद्वारे घरानेशाहीतील पुढारीपुत्राला संधी मिळणार की एखाद्या पक्षाच्या सध्या कार्यकर्त्यालाही नगराचा प्रथम नागरिक होण्याची संधी मिळणार, याचा एका सोशल मीडियात रमणार्या तरुणाने घेतलेला वेध.


--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
नगरच्या महापालिका निवडणुकीला अजूनही वर्षभराचा अवकाश आहे. त्यासाठी काहींनी छुप्या पद्धतीने यासाठी तयारी केलेली आहेच. मात्र, थेट समोर येऊन अजून एकानेही निवडणुकीवर बोलण्यास सुरुवात केलेली नाही. मात्र, चालू महिन्यात शेजारच्या औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घोषणा केली की, यापुढे क आणि ड वर्ग महानगरपालिकांच्या महापौरपदाची निवड नगराध्यक्ष आणि सरपंच पदांप्रमाणे यापुढे थेट लोकांमधुन केली जाणार आहे.

या एकाच घोषणेमुळे नगरसह राज्यभरातील क आणि ड वर्गाच्या महानगरपालिकांमधील राजकारणाला खर्या अर्थाने गती आली आहे. पुढील वर्षाच्या अखेरीस होणार्या नगरच्या निवडनुकीबद्दलाही मग चर्चा सुरू झाली. शहराचे पुढील महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले आहे. त्यामुळेच कोणत्या आजी-माजी खासदार-आमदार यांचा मुलगा किंवा पुतण्या आणि कोणत्या नेत्याच्या कुटुंबातील तरुणास थेट जनतेतून महापौर होण्याची संधी असेल याबद्दल नगरच्या जनतेत चर्चा सुरू झाली आहे. 

प्रबळ घराण्यातील काहींनी मग यासाठी चाचपणीही सुरू केली आहे. प्रत्येक राजकीय पक्षामधील प्रस्थापित यासाठी तयार झाल्याचेच चित्र आहे. तर, बहुसंख्य नगरकरांना वाटतेय की एखाद्या सर्वसामान्य घरातील आणि राजकीय पक्ष आणि नगरकरांच्या विकासासाठी जीव ओतून काम करणार्या सध्या कार्यकर्त्यालाही यातून महापौर होण्याची संधी मिळू शकते. मात्र, नगराचे एकूण राजकीय आणि सामाजिक वातावरण लक्षात घेता साधा कार्यकर्ता शहराचा प्रथम नागरिक होणार की नाही, याबद्दल मोठीच साशंकता आहे.

नगरपालिका असताना १९७६ मध्ये प्रथम थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला गेला होता. त्यावेळी कै. शंकरराव घुले तात्या यांच्यासाराख्याला याच नगर शहराने बहुमताने संधी दिली होती. तर, राज्यात युतीची सत्ता असतानाही पुन्हा एकदा अशाच निर्णयातून २००१ मध्ये भाजपच्या अनिता आगरकर यांना नगरकरांनी नगराध्यक्षपदी बसविले होते. नगरसेवकांमधून महापौर निवडताना रंगणारा अर्थपूर्ण घोडेबाजार आपल्या नगरसह राज्यालाही माहिती आहे. त्याच पार्श्वभूमीवर थेट जनतेतून असे पद निवडताना मतदारांकडून वेगळा आणि धक्कादायक कौलही मिळण्याची परंपरा पाहता नगरच्या महापौरपदी एखादा साधा किंवा उच्च शिक्षित व्यक्ती निवडल्यास नवल वाटायला नको, अशीच स्थिती आहे.

अशा पद्धतीने दोन वेळा मासपर्यंत पोहोचण्याचे कोणतेही ठोस व्यासपीठ उपलब्ध नगरने सध्या आणि सामाजिक कार्यात रमणार्या व शिकून विचारी भूमिका घेणार्यांना प्रमुख पदावर बसविण्याचा इतिहास आहे. आता मात्र, सोशल मिडीया नावाचे एक उत्तम आणि तरुणांसह अबाल-वृद्धांना आपलेसे वाटणारे व्यासपीठ सर्वांसाठी खुले झाले आहे. याच डिजीटल क्रांतीसह मोफत इंटरनेट देणाऱ्या ‘जिओ’मुळे आता नेते आणि कार्यकर्त्यांनाही आपले विचार आणि काम थेट घराघरांत पोहोचविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. 

नगरमध्येही आज प्रत्येक घरातील किमान एका व्यक्तीकडे स्मार्टफोन आहे. त्यामुळेच नगरमधील पुढील निवडणुकाही २०१४ च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणेच सोशल मीडियातून रंगणार आहे. वर्षभरापुर्वी झालेया पुणे, नाशिक, मुंबई आदि महापालीकांसह जिल्हा परिषद निवडणुकीतही सोशल मिडीयाने अनेक ठिकाणी चित्र बदलले होते. फ़क़्त इमेज न टाकता माहितीपूर्ण पोस्ट आणि एक भूमिका घेऊन लेख आणि विचार मांडणार्या अनेक सध्या कार्यकर्त्यांनीही या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीतून विजयी होण्याची किमया केली आहे. त्यामुळे याच सोशल मिडीयाच्या तंत्रशुद्ध वापरातून नगरच्या महापौरपदी एखाद्या नव्या दमाच्या कार्यकर्त्यास संधी मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको...

- राहुल सीताराम ठाणगे
(सोशल मिडिया अभ्यासक,अहमदनगर )

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.