ब्लॉग - भंडारदरा धरण @ ९२


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अकोले तालुक्यातील पश्चिमेला सह्यगिरीच्या पर्वत रांगेमध्ये १९२६ मध्ये भंडारदरा धरणाचे त्याकाळचे ब्रिटिश गव्हर्नर सर लेस्ली ओर्मी विल्सन यांच्या हस्ते औपचारिकरित्या उद्घाटन झाले. भारतामधील प्रमुख धरणांपैकी एक भंडारदरा धरण हे त्याकाळचे सर्वात उंच दगडी धरण मानले गेले. हेच भंडारदरा धरण आज रोजी ९२ व्या वर्षांत पदार्पण करत आहे.
९ ऑगस्ट १९०७ भंडारदरा धरणाला ब्रिटीश सरकारची मान्यता मिळाली. एप्रिल १९१० मध्ये धरणाच्या बांधकामास सुरुवात झाली. या बांधकामावर त्यावेळचे चिफ इंजिनियर ऑर्थर हिल यांची करडी नजर होती. या धरणाचे काम सुरु झाले तेंव्हा २२९०० एकर जमीन पाण्याखाली जाणार होती. धरणाच्या बांधकामासाठी लागणारे साहित्य जवळच असणाऱ्या घोटी रेल्वेस्थानकावर उतरविले जायचे. 
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
धरणासाठी लागणारा दगड परिसरातच खाणी खोदून उपलब्ध करण्यात आला. त्यावेळी वाळू उपलब्ध नसल्याने दगडाच्या चुऱ्याचाच वापर वाळू म्हणून करण्यात येत होता. जसजसे भंडारदरा धरणाचे काम वेगाने पुढे सरकत होते, तसतसे भंडारदऱ्याचा शांत असणारा परिसर गजबजायला लागला. आदिवासी रयतेला पहिल्यांदाच सायबाच्या पोराची कमाल बघताना टेलिफोन, टपाल, दवाखाना या सोयी बघून कुतूहल वाटत होते. 

१९२० मध्ये २०० फुटापर्यंत धरणात पाणी साचविण्यात आले. त्याचवेळी पहिल्यांदाच प्रवरामाईच्या पात्रात पाणी सोडण्यात आले. अगोदर भंडारदरा धरणाची उंची २५० फुटापर्यंत निश्चित करण्यात आली होती; पंरतु त्याकाळच्या गव्हर्नरच्या डोक्यात जास्त पाणी धरणात सामावू शकते हा विचार घोळत होता. म्हणूनच नंतर ही उंची २७० फुटापर्यंत निश्चित करण्यात आली. 

धरणाला एकूण चार मोऱ्या तयार करण्यात आल्या असून त्यासाठी लागणारे साहित्य इंग्लडमधूनच मागविण्यात आले. १९२६ मध्ये धरणाच्या दगडी भिंतीचे काम पूर्ण झाले. या धरणासाठी एकूण खर्च १ कोटी ५० लाख ८३ हजार ४५१ रुपये आला. याचवर्षी धरणामध्येही पूर्ण क्षमतेने पाणी साठविण्यात आले. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
पावसाळा आल्यानंतर शिखर स्वामिनी कळसूबाई, अलंग, कुलंग, मदन यासह शिंदोळ्या, रतनगड या सह्यगिरीच्या पर्वत माथ्यावर कोसळणाऱ्या पावसाच्या सरीमुळे अवतीर्ण झालेले ओढे नाले कवेत घेऊन प्रवरामाई पहिल्यांदाच काळ्या पाषाणाच्या भिंतीमुळे सह्यगिरीच्या डोंगरदऱ्याच्या कुशीत विसावली होती. १० डिसेंबर १९२६ रोजी ब्रिटीश गव्हर्नर विल्सन यांच्या उपस्थितीत भंडारदरा धरणाच्या उद्घाटन होऊन तो रयतेच्या स्वाधीन करण्यात आला.

भंडारदरा धरणाची निर्मिती झाल्यामुळे ओसाड असणाऱ्या जमिनीमध्ये पाण्याचा खळखळाट सुरु झाल्याने हिरवेगार पिके डोलू लागली तर सहकारी साखर कारखान्यांनी या धरणाच्या पाण्याच्या जोरावरच कात टाकली. म्हणूनच तर आजही भंडारदरा धरण हे उत्तर नगर जिल्ह्यासाठी संजीवनी देणारे जीवनदायी समजले जाते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.