ब्लॉग - साईबाबांच्या भक्ताच्या मृत्यू प्रकरणात दोष नेमका कुणाचा ?

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :देवाच्या दारी दर्शनासाठी आलेल्या भक्ताच्या मृत्यूच्या घटना तशा नव्या नाहीत. देशातील अनेक मंदिरांमध्ये कधी चेंगरा चेंगरी तर कधी दर्शनबारीत तास न् तास उभे राहिल्याने त्रास होऊन भक्ताचा मृत्यू झाल्याच्या घटना अनेकदा घडलेल्या आहेत. देवस्थांकडून अशा घटना घडू नये, म्हणून खबरदारी घेतली जात आहे. परंतु त्याची अंमलबजावणी किती होते, हे पुन्हा एखादी घटना घडल्यावर स्पष्ट होते. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
शिर्डी येथील साईबाबांच्या समाधीचे शताब्दी महोत्सव सुरु आहे. या महोत्सानिमत्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. साईबाबांची किर्ती देशभर पसरल्याने येथे येणार्‍या भाविकांचा ओघ गेल्या काही वर्षांपासून वाढलेला आहे. परंतु या महोत्सव काळात साईभक्ताचा दर्शनबारीत झालेला मृत्यू सगळ्यांच्या मनाला चटका लावून जाणारी घटना आहे. या घटनेमुळे मंदिर परिसरात होणारी गर्दी व दर्शनाचे ढिसाळ नियोजन उघड झालेले आहे. या घटनेत नेमका दोष कुणाचा असाच प्रश्‍न आता सगळ्यांना पडलेला आहे. त्याचे उत्तर मात्र कोणलाच मिळालेले नाही. 

देवाच्या दारात प्रत्येकजण काही तरी गर्‍हाणे घेऊन येत असतो. आपल्यावरील व आपल्या कुटुंबावर आलेल्या संकटातून मार्ग निघावा, म्हणून काहीजण येत असतात. तर काहीजण मनाला शांती मिळावी म्हणून देवाच्या दारात होऊन लीन होत असतात. देवाच्या दारात येणारा काही तरी मनात इच्छा ठेऊनच येतो. हे तितकेच खरे आहे. तसीच काही तरी मनात इच्छा ठेऊन तेलंगणा राज्यातील थल्लरी केशवराव भद्रय्या हे 55 वर्षीय वृध्द साईबाबांच्या चरणी लीन होण्यासाठी शिर्डी आपल्या कुटुंबियांसमवेत आले होते. ते अपंग असल्याने त्यांना लवकर दर्शन मिळावे, यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी उपस्थित साई कर्मचार्‍यांना विनंती केली. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
त्यानंतर त्यांना अपंगाच्या दर्शन रांगेतून दर्शन मिळावे, यासाठी पासेसही मिळाले. ते तेथून दर्शनासाठी जात असतानाच त्यांना त्रास जाणवू लागल्याने ते खाली बसले अन् त्यांचा मृत्यू झाला. देवाच्या दारात दर्शनासाठी गेल्यानंतर थल्लरी केशवराव भद्रय्या यांचा मृत्यू होईल, असे त्यांच्या कुटुंबियांना कधी वाटले नसले. पण ते घडले. थल्लरी केशवराव भद्रय्या यांचा मृत्यू नेमका कशाने झाला हे कारण शोधण्यापेक्षा दर्शन रांगेत त्यांना वेळेवर दर्शन घेता नाही आले, म्हणून त्यांचा मृत्यू झाल्याचे आज तरी त्यांचे कुटुंबिय म्हणत आहेत. 

शिर्डीत जर अपंगांसाठी दर्शन पास व वेगळी रांग आहे, याची माहिती भक्ताला नव्हती का ? ते अपंग आहेत, हे पाहून संस्थानचे कर्मचार्‍यांनी त्यांना वेळीच अपंगांना दर्शन पासेस असून वेगळी रांग आहे, हे सांगितले नाही का? असे एक ना अनेक प्रश्‍न आता उपस्थित होत आहे. या सर्व प्रश्‍नांचा अभ्यास आता साईसंस्थानने करणे गरजेचे आहे. पुढच्याला ठेच मागचा शहाणा या म्हणी प्रमाणे आता संस्थानला ठेच लागलेली आहे. आता तरी साईबाबा संस्थानने शहाणे होऊन, अशा घटना पुन्हा घडणार नाही, यासाठी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. 

आगामी काळात शताब्दी महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांना भाविकांची गर्दी होणार आहे. या गर्दीच्या काळात थल्लरी केशवराव भद्रय्या यांच्या मृत्यूसारखी दर्शन रांगेत पुन्हा एखादी घटना घडू नये, यासाठी आता उपाय योजना करणे गरजेचे आहे. तसेच दर्शन रांगे जवळपासच एखाद्याला त्रास झाला तर त्याला तेथेच औषधोपचार मिळण्यासाठी फिरते डॉक्टर ठेवणे गरजेचे आहे, हे ओळखून तशा उपाय योजना करण्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे. तरच अशा घटना पुढील काळात घडण्यापासून टळणार आहे. नाही तर अशा घटना कायमच घडत राहतील. रोगावर तात्पुरता ईलाज करून जमणार नाही तर रोगाचे समूळ उच्चाट करण्यासाठी प्रयत्न महत्वाचे आहे. 

साईबाबा देवस्थाने अद्यावत असे रुग्णालय उभारले. परंतु हे रुग्णालय असून अडचण नसून खोळंबा अशी झालेली आहे. भक्ताच्या मृत्यूमुळे रुग्णालयाची पोलखोल झालेली आहे. या रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची वाणवा आहे. येथे पूर्वी प्रमाणे रुग्णांना सुविधा मिळत नाहीत. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही देवस्थान त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. शताब्दी महोत्सवानिमित्त येणार्‍या भाविकांची गर्दी लक्षात घेता एखादी घटना अनुचित घटना घडली तर रुग्णालय अद्यावत असे गरजेचे आहे. परंतु त्याकडे देवस्थानाबरोबर मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांचे दुर्लक्ष ही सगळ्यांसाठी चिंतेची बाब आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.