ब्लॉग - विद्यार्थ्यांची उपस्थिती महत्वाची

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :छडी लागे छम छम विद्या येई घम घम असे म्हटले जात होते. मात्र विद्यार्थ्यांना आता बालकांचा शिक्षणाचा हक्क कायद्यामुळे शिक्ष करणे बंद झालेले आहे. त्यामुळे शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून चुका झाल्या तरी शाळांमध्ये शिक्षा केली जात नाही. बालकाच्या शिक्षणाच्या हक्क कायद्यामुळे अनेकदा शिक्षकांना विद्यार्थी घडावे महणून शिक्षा करावी वाटली तरी करता येत नाही. त्याचे दुष्पपरिणाम सध्या दिसून येत आहेत. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
शाळेंमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढण्यासाठी शासनाकडून अनेक प्रयत्न केले जात आहे. त्या प्रयत्नांना त्यांना किती यश आले हे गुलदस्त्यात आहे. परंतु अहमदनगर शहरातील सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूलने विद्यार्थ्यांची उपस्थितीती 100 टक्के राहण्यासाठी अभिनव योजना सुरु केलेली आहे. जो विद्यार्थी वर्षभर 100 टक्के हजेरी लावली. त्याचा वार्षिक स्नेहसंमनेलच्या कार्यक्रमात सन्मान करण्याची अभिनव योजना सुरु केलेली आहे. हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे. 

शाळा-महाविद्यालयांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवित असतात. या विद्यार्थ्यांनी नेहमीच शाळेत यावे, यासाठी शाळा व्यवस्थापन व शासन नेहमीच प्रयत्न करीत असतात. शालाबाह्य विद्यार्थी शाळेत यावे, यासाठी शासनाकडून शालाबाह्य विद्यार्थ्यांची शोध मोहीम सुरु करून जूनमध्ये या शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेत त्यांच्या वयोमाननाप्रमाणे प्रवेश देऊन त्यांचा गुलबापुष्प देऊन सन्मान केला जात आहे. शालाबाह्य विद्यार्थ्यांचे शाळेत पहिल्याच दिवशी ढोलताशांच्या गजरात शाळा स्वागतही करत आहे. 

गेल्या काही वर्षांपासूनही ही मोहिम राज्यभर सुरु आहे. यामुळे शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रमाण काही अंशी कमी झालेले आहे. अजूनही काही मुले शालाबाह्य आहेत.त्यांना शाळेत आणण्यासाठी सर्वांचेच प्रयत्न सुरु आहे. ही मोहिम फक्त शाळा सुरु होण्याच्या अगोदर राबविली जाते. त्याऐवजी ही मोहिम कायमस्वरुपी राबविणे गरजेचे आहे. तरच शालाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रमाण 0 टक्के होऊ शकते. 

त्यासाठी शासनाला व शाळा तसेच शिक्षकांना अजूनह मेहनत घ्यावी लागणार आहे. शाळेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर अनेक विद्यार्थी कधी घरगुती तर कधी आजारी असल्याचे कारणे पुढे करून शाळा बुडवित असतात. विद्यार्थ्यांचे हे प्रमाण कमी व्हावे, यासाठी अनेक शाळांमध्ये वेगवेगळे उपक्रम राबविले जात असतात. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची अनुपस्थितीबद्दल त्यांना दंड केला जात आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
विद्यार्थ्यांनी नेहमीच शाळेत उपस्थित रहावे, हा हेतू त्यामागचा असतो. अहमदनगर शहरातील सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूलने विद्यार्थ्यांची 100 टक्के उपस्थितीसाठी अभिनव उपक्रम गेल्या काही वर्षांपासून सुरु केलेला आहे. जे विद्यार्थी वर्षभर 100 टक्के उपस्थित राहतील, अशा विद्यार्थ्याचे व त्याच्या पालकांचा स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात सन्मान करण्याची ही योजना आहे. 

या अभियनामुळे सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा टक्का 90 टक्क्यांवर आहे. यासाठी कोणत्याही विद्यार्थ्याला त्यांनी शिक्षा केलेली नाही व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहिलेच पाहिजे, अशी सक्कीत केलेली नाही. शाळेच्या उपक्रमात आपला व आपल्या पालकांचा सन्मान व्हावा, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांची असते. 

त्यामुळे मुलांचे शाळा बुडविण्याचे प्रमाण कमी झालेले आहे. हा उपक्रम यशस्वी ठरलेला आहे. या उपक्रमामध्ये नगरमधील कैवल्य नाम विद्यार्थ्याने एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल सात वर्षे शाळेत 100 टक्के हजेरी लावलेली आहे. सेंट विवेकानंद इंग्लिश मीडियमचा हा अभिनव उपक्रम राज्यभर अनुकरला जावा, असाच आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.