भाजपचे एजंट राधाकृष्ण विखे यांनी राजीनामा द्यावा.डॉ.अशोक विखे यांची मागणी.

डॉ. अशोक विखे पाटील :- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्या साठी भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थ मंत्री यशवंत सिन्हा यांनी विदर्भात ' अकोला ' येथे शेतकरी आंदोलन सुरू करून सरकारला वठणीवर आणण्याचे काम केले आहे.सत्ताधारी भाजपचं नेते असून सुद्धा यशवंत सिन्हा यांनी शेतकरी हितासाठी विरोधी पक्षाची भूमिका घेतली याबद्दल त्यांचे कौतुक करायलाच हवे ! यशवंत सिन्हा हेच खरे महाराष्ट्राचे खरे विरोधी पक्ष नेते आहेत. भाजपाशी हातमिळवणी करून सरकारी एजंट ची भूमिका घेणारे कॉंग्रेचे राधाकृष्ण विखे हे विरोधी पक्ष नेते या पदाला लायक नाहीत. या पदावरून राधाकृष्ण विखे यांची हकालपट्टी करावी अशी माझी मागणी आहे.

File Photo - Dr Ashok Vikhe Patil
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
राधाकृष्ण विखे यांनी स्वतःच्या शिर्डी मतदार संघात पुणतांबा येथे जून महिन्यात झालेला शेतकरी संपात फूट पाडून भाजप सरकारला मदत केली होती हे संपूर्ण राज्याला माहीत आहे. त्याच्या ताब्यात असलेला प्रवरानगरचा विखे पाटील साखर कारखान्याने ऊस उत्पादकांना एफ आर पी प्रमाणे भाव दिला नाही. एफ आर पी पेक्षा प्रति टन ३०० रुपये कमी दर दिला आहे.

विरोधी पक्ष नेता स्वतःच्या साखर कारखान्याच्या सभासदांना भाव देऊ शकत नाही तो राज्यातील शेतकऱ्यांचे काय भले करणार आहे ? राधाकृष्ण विखे हे शेतकरी विरोधी आणि भाजप धार्जिणे आहेत. सत्तेतून, राकरणातून पैसा कमावणे यासाठीच पदाचा वापर करतात.शेतकऱ्यांच्या, गरीब जनतेच्या प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना वेळ आणि रस नाही असा माझा आरोप आहे.सरकारी धार्जिना आणि शेतकरी विरोधी भूमिका घेणारा विरोधी पक्ष नेता अशी राधाकृष्ण विखे यांची महाराष्ट्रात नोंद घ्यावी करायला हवी.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

◆यशवंत सिन्हा हेच खरे विरोधी पक्ष नेते
 शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या संपूर्ण शेतमाल नाफेड ने हमीभावात खरेदी करावा, हमीभावात खरीदी करतांना कोणतीही अट व शर्ती घालू नयेत,सर्व शेतीमालासाठी तफावतीची रक्कम ' भावंतर ' योजनेतून द्यावी या महत्त्वाच्या प्रमुख मागण्यासाठी भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थ मंत्री यशवंत सिन्हा यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी विदर्भात अकोला पोलीस मुख्यालयात 3 डिसेंबर पासून राज्य सरकार विरोधात आंदोलन सुरू केले आहे. त्याला राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, प बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी,कम्युनिष्ठ पक्ष नेते सीताराम येचुरी, प्रकाश आंबेडकर, या नेत्यांनी पाठींबा दिला आहे. 

काँग्रेस मात्र गप्प आहे. काँग्रेस चे विरोधी पक्ष नेते शांत बसले आहेत. त्यांना तर शेतकऱ्यांचे काहीच देने घेणे नाही. त्यामुळे महाष्ट्राचं विरोधी पक्षनेते यशवंत सिन्हा आहेत, राधाकृष्ण विखे नाहीत. सरकारला वठणीवर आणण्याचे काम सुरू केल्याबद्दल यशवंत सिन्हा यांचे आभार आणि कौतुक आहे. माझा त्याच्या लढ्याला पाठिंबा आहे. शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर अशा वेळी स्वपक्ष आणि सरकार विरोधात आवाज उठविलाच पाहिजे अशी शिकवण माझे वडील तीर्थरूप पदमभूषण बाळासाहेब विखे पाटील यांचे कडून मला मिळाली आहे. 

त्यामुळेच मी सुद्धा शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. यशवंत सिन्हा यांच्या विदर्भातील आंदोलनाला तसेच ऊस उत्पादकांना एफ आर पी कायद्याने दर मिळालाच पाहिजे यासाठी विरोधी पक्ष नेत्याच्या लोणी गावात आयोजित केलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या 'बेमुदत उपोषणाला ' संपूर्ण पाठिंबा आहे.
शेतकऱ्यांनी एकीची ताकद दाखवावी ही विनंती.

आपला विश्वासू,
डॉ. अशोक बाळासाहेब विखे पाटील

कार्यकारी अध्यक्ष,
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था,
प्रवरानगर,जिल्हा- अहमदनगर

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.