Happy Birthday डॉ.सुजय विखे पाटील....

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सामाजिक योजनांची संकल्पना मांडून यशस्वी आंमलबजावणीद्वारे त्या संकल्पनांना मुर्त स्वरूप देवून त्या सिद्धीपर्यंत पोहचवणारे डॉ. सुजयदादा विखे पाटील हे विखे पाटील यांच्या कुटुंबातील चौथ्या पिढीचे नेतृत्व करीत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अल्पावधीतच त्यांनी घेतलेल्या उत्तुंग कार्य भरारी विषयी थोडक्यात.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्राला समृद्धीच्या दिशेने नेण्याचे मोठे काम उभे केले. त्यांच्या या महान कार्यामुळेच तिसरी शिकलेला हा माणूस 'डॉक्टरेट'चा मानकरी ठरला.
 
डॉ. सुजय विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबावर कोसळणारा दु:खाचा डोंगर किती भयावह असेल या जाणिवेतून अशा कुटुंबांना आधार देण्यासाठी काय करता येईल याची आखणी केली. जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी जाऊन डॉ. सुजय विखे यांनी त्या कुटुंबाची परिस्थिती जाणून घेतली.शासनाच्या तुटपुंज्या मदतीपेक्षाही या कुटुंबाच्या जीवनात नवचैतन्य आणण्यासाठी डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या नावानेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब सहाय्य योजना आणली. 

या योजने अंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलामुलींचे पदवीपर्यंतचे शिक्षण, मुलींचा विवाह, कुटुंबांना आरोग्य सुविधा आदी जबाबदाऱ्या विखे पाटील यांच्या कुटुंबाच्या वतीने स्वीकारतानाच अशा कुटुंबातील एका व्यक्तीला त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरीची उपलब्धता, त्या कुटुंबातील महिलांना कुटुंबाचा चरितार्थ चालविता यावा यासाठी शिलाई मशीन,पिठाची गिरणी या सारखी रोजगाराची साधने उपलब्ध करून देणे तसेच बचतगटांच्या माध्यमातून प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य केले. त्यांच्या दायित्वामुळे जिल्ह्यातील २०८ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मोठा आधार निर्माण झाला आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
राज्यातील सहकारी साखर कारखाने कवडीमोल किमतीने विकून टाकण्याच्या प्रक्रियेला काही प्रमाणात पायबंद बसला. शेजारील राहुरी तालुक्यातील डॉ.तनपुरे कारखान्याच्या बाबतीतही डॉ. सुजय विखे यांनी अशीच भूमिका घेतली . गेल्या तीन वर्षांपासून बंद असलेल्या हा कारखाना वाचविण्यासाठी टाकलेले विखे पाटील यांचे दुसरे पाऊल सुध्दा यशस्वी ठरले. 

दोन धरणांच्या पाण्यामुळे बागायत असलेल्या या तालुक्याला हा कारखाना बंद पडल्यामुळे काहीशी मरगळ आली होती. परंतु डॉ. सुजय विखे यांच्या प्रयत्नामुळे या भागात नवचैतन्य निर्माण झाले. या कारखान्याचे धुराडे पेटल्यामुळे पुन्हा एकदा हा तालुका गतवैभव प्राप्त करू शकणार आहे. पद्मश्री विखे पाटील यांनी सुरु केलेल्या सहकार चवळीच्या मार्गावरून जाताना पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी ग्रामीण विकासाच्या संकल्पना खऱ्या अर्थाने कृतीत उतरविल्या.

डॉ. सुजय विखे पाटील हे विकासाचा अजंडा खऱ्या अर्थाने राबविणारे नेतृत्व आहे. भौगोलिकदृष्टया अहमदनगर जिल्हा खुप मोठा आहे. प्रत्येक तालुक्याचे प्रश्न वेगळे आहेत. एकीकडे उत्पादित शेतीमालाला विक्री व्यवस्थेपासून हमीभावापर्यंतचे सर्वच प्रश्न ऐरणीवर आहेत.

तर दुसरीकडे रोजगारासाठी तरुण वर्ग आशाळभूत नजरेने बघतो आहे. ग्रामीण भागातील जनतेचे स्थलांतर दिवसेंदिवस वाढत आहे. पाण्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. या परिस्थितीत डॉ. सुजय विखे पाटील एवढाच एक आशेचा किरण तरुण पिढी समोर आहे. डॉ.सुजय विखे पाटील हे त्यांच्या धोरणानुसार शेतीतील जोडधंद्यापासून कृषी औद्योगिकीकरणाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. 

जिल्ह्यातील या सर्व कृषी वाटचालीला औद्योगिकीकरणाची जोड मिळाली तर जिल्ह्यात सामाजिक आणि आर्थिक परिणाम निश्चितच सकारात्मक दिसतील. डॉ.सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा. 

- दत्ता विखे पाटील, लोणी, अहमदनगर  

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.