पालकमंत्री राम शिंदे आणि खासदार दिलीप गांधीना शेवगावच्या शेतकऱ्यांचा विसर !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शेवगाव तालुक्यातील घोटण, खानापूर येथील ऊस दराबाबत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी गोळीबार केला. यात दोन शेतकरी गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर अहमदनगर शहरातील मॅक्सस्केअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, भाजप चे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे,आदी नेत्यांनी भेटी घेतल्या असून पालकमंत्री राम शिंदे आणि खासदार दिलीप गांधी मात्र या आंदोलन कर्त्या शेतकऱ्यांची भेट ही घेण्याचेच विसरले आहेत.


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
पालकमंत्र्यांना आत्मपरीक्षण करण्याची गरज 
स्वताच्या मतदार संघातील आंदोलनकर्त्या शेतकर्याना दुखापत झाल्याची घटना ताजी असतानाच त्यांना भेट देण्याएवजी पालकमंत्री नगर तसेच कर्जत आणि जामखेड मध्ये उद्घाटन सोहळे करणार आहेत, पालकमंत्री या नात्याने जिल्ह्यातील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेणे हे प्रथमकर्तव्य पालकमंत्री विसरले आहेत, निवडणुकांच्या काळात स्वताला भूमिपुत्र म्हणवून घेणार्या प्रा.राम शिंदे यांनी शेवगाव मधील या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले आहे.

शेवगावात जायला खासदार गांधींकडे वेळ नाही ! 
जैन मुनीबद्दल खा.संजय राउत यांनी वादग्रस्त विधान केल्यानंतर लगेच रस्त्यावर उतरत आंदोलन करणार नगर दक्षिणचे खासदार दिलीप गांधी यांनी ही या वादात न पडणे हेच योग्य समजले आहे. खा. गांधी यांना गेल्या ३ पंचवार्षिक निवडणुकांत शेवगाव तालुक्याने सर्वाधिक मताधिक्य दिले,खा.गांधी विविध विकास कामाच्या उद्घाटन आणि बँकिंगच्या कामानिमित शेवगाव मध्ये असतात, मात्र स्वताच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांवर गोळीबार झाल्यानंतरही खासदार गांधी यांना या शेतकर्याना साधे भेटून विचारपूस करण्यासही वेळ मिळालेला नाही. राहुरी, श्रीगोंदा, पारनेर आणि आता शेवगावकरांचीही नाराजी खासदार गांधी यांना आगामी निवडणुकांत जाणवू शकते.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पुन्हा बरळले !
नेहमीच बोलून वाद ओढवून घेणारे आणि रोषाला बळी पडणारे भाजप प्रदेशाध्यक्ष दानवे नगर मध्ये पुन्हा जरा 'जास्तच' बोलले ''पोलीस शेतकऱ्यांच्या पायावर गोळी मारु शकत होते. मात्र त्यांनी छातीवर गोळ्या झाडल्या. पोलिसांची ही कृती चुकीचीच आहे'.असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले आहे.

शेतकऱ्यांत असंतोष, सरकार, प्रशासनाविरोधात राग ! 
सदर गोळीबारात २ शेतकरी जखमी झाले असून, पोलीसांनी १६ शेतकर्यांना अटक केली असून त्या सर्वांवर गुन्हे दाखल केले आहेत, विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांचा आणि स्थानिक नागरिकांचा काहीही सहभाग नसतानाही त्यांना अटक करत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत त्यामुळे येथील शेतकऱ्यांमधील सरकार आणि प्रशासना विरोधात असणारा राग कमी होण्याएवजी अनावर होताना दिसत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.