विखेंनी श्रीगोंदे करांना मदत करावी - अण्णासाहेब शेलार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांत भारतीय जनता पक्षाला म्हणजेच माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना तोंड देण्यासाठी श्रीगोंद्यातील कॉंग्रेसजनांना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांची मदत हवी आहे. 

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .

बेलवंडी येथे झालेल्या एका कार्यक्रमात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब शेलार यांनी भाषणातून, भाजपचा मुकाबला करण्यासाठी विखे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंद्यातील नेत्यांनी पुन्हा एकदा वज्रमूठ बांधण्याची गरज असल्याची अपेक्षा व्यक्त केली. त्यामुळे विखे यांचे पूत्र डॉ. सुजय विखे यांना लोकसभा निवडणुकीच्या मदतीसाठी कॉंग्रेसचे कार्यकर्ते सज्ज झाल्याचे संकेत आहेत.

शिवाजीराव नागवडे यांचे आव्हानही
मागील विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार राहुल जगताप यांच्याकडून पराभव पत्कारावा लागला. जगताप यांना आगामी काळात स्पर्धक म्हणून पाचपुते हेच आहेत. या दरम्यान कॉंग्रेसकडून ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे यांचे आव्हानही पाचपुतेंना आहे.

विखेंनी श्रीगोंदेकरांना मदत करावी
विखे यांचे पूत्र डॉ. सुजय विखे यांनी नगर मतदारसंघातून लोकसभेसाठी उमेदवारी केल्यास विखेंना श्रीगोंदेकरांची मदत घ्यावी लागणार आहे. विशेषतः नागवडे यांच्या मदतीशिवाय श्रीगोंद्यातील गड जिंकणे मुश्‍किल होईल. त्या पार्श्‍वभूमीवर ज्येष्ठ नेते अण्णासाहेब शेलार यांनी विखेंनी श्रीगोंदेकरांना मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

नागवडे यांनीही मदत करावी
आमदार बाळासाहेब थोरात यांचे समर्थक साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. डॉ. सुजय विखे आगामी काळात लोकसभेची निवडणूक लढवितील. श्रीगोंदेकरांनी त्यांना मदत करावी. विशेषतः नागवडे यांनीही मदत करावी, असा सूर ज्येष्ठ नेत्यांनी आपल्या भाषणातून काढला. श्रीगोंद्याकडे विखे पाटील यांचे विशेष लक्ष असल्याचेही त्यातून स्पष्ट झाले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.