कर्जत -जामखेड तालुक्यातील रस्त्यांच्या कामांसाठी १० कोटी निधी मंजूर.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पालकमंत्री ना.प्रा.राम शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने कर्जत व जामखेड तालुक्यातील १७ रस्त्यांसाठी तब्बल १० कोटींचा निधी मंजूर केला आहे. तालुक्यातील ग्रामीण मार्गांना प्रथमच एवढा मोठा निधी मंजूर झाला असून, याबाबत गुरूवारी ( दि.२) सार्वजनिक बांधकाम विभागाने शासन निर्णय काढले आहे. 


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
दरम्यान यापूर्वीच शासन निर्णय क्रमांक रवियो-२०१७ /प्र.क्र.२१० /नियोजन-२ दिनांक ७ सप्टेंबर २०१७ अन्वये मान्यता मिळाली आहे. यामुळे या रस्त्यांच्या कामासाठी निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. आता ग्रामीण भागातील नागरिकांना पक्के डांबरीकरणाचे रस्ते मिळणार असल्याने दिलासा मिळाला आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
कर्जत व जामखेड तालुक्यातील रस्त्यांची स्थिती सुधारावी, यासाठी पालकमंत्री ना.शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीमार्फत बांधकाम विभागाकडे या रस्त्यांचा दर्जा वाढविण्यासाठी पाठपुरावा केला. आता रस्ते हे सुधारतील.यापूर्वी राज्यशासनाकडून या रस्त्यांना निधी प्राप्त होत नव्हता. गेल्या अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच एवढा मोठा निधी मिळाला आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.