अहमदनगरमध्ये वेगवेगळ्या घटनांत दोघांचा खून.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अहमदनगरमध्ये दोन वेगवेगळ्या घटनांत दोघांचा निर्घृण खून करण्याच्या घटना घडल्या आहेत. यात सोनेवाडी बायपासजवळ २५ ते ३० वर्षाच्या एका युवकाचा अज्ञातांनी जाळून खून केला. तर दुसऱ्या घटनेत पाईपलाईन रस्त्यावरील निर्मलनगर येथील गाडेकर चौकात मुलानेच स्वत:च्या वडिलांचा खून केल्याची घटना घडली आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
याबाबत सविस्तर असे की, कोतवाली पोलिसांना सोनेवाडी येथील ग्रामस्थाने दूरध्वनीवरून सोनेवाडी बायपास जवळ एका युवकाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह पडला असल्याचे सांगितले. त्यानुसार कोतवालीचे पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

सोनेवाडी रस्त्यावर रोडपासून १० फुटांच्या अंतरावर २५ ते ३० वर्षांच्या युवकाचा मृतदेह पडला असल्याचे दिसून आले.या युवकाचा चेहरा व अंगावरील कपडे सर्व जळाल्यामुळे मृताची ओळख पटली नाही. पोलिसांनी रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना याबाबत चौकशी केली. मात्र याबाबत कोणतीच माहिती मिळाली नाही.

दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्याने कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अभय परमार पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मात्र मृतदेह आढळून आलेली जागा ही नगर तालुका पोलिस स्टेशनच्या हद्दीत आहे की कोतवाली पोलिस स्टेशनच्या याबाबत प्रश्न उपस्थित झाल्याने नगर तालुक्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर परदेशी हेही तात्काळ घटनास्थळी हजर झाले. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
मात्र दोन्ही अधिकाऱ्यांत एकमत होत नव्हते. शेवटी निरीक्षक अभय परमार हे कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यास तयार झाले व कोतवाली पोलिसांनी अज्ञात युवकाच्या खून व खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी प्रकरणी अज्ञात इसमांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या घटनेत शहरातील निर्मलनगर येथील गाडेकर चौकात राहणाऱ्या तरूणाने अपंग वडिलांचा खून करून मृतदेह घरासमोरील टपरीत लपवून ठेवला. शनिवारी सकाही साडेअकरा वाजता पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर ही बाब उघडकीस आली. यातील खून करणाऱ्या मुलास पोलिसांनी घटनास्थळीच अटक केली. दत्तात्रय फकिरा गिते (वय ५०) असे मयताचे नाव असून,अशोक दत्तात्रय गिते (वय २२ )असे सदरच्या मुलाचे नाव आहे.

गाडेकर चौक परिसरात चैतन्य अर्पाटमेंटसमोर राहणारे दत्तात्रय गिते यांचा दरवाजा सकाळचे ११ वाजले तरीही उघडला नसल्याने शेजारी राहणाऱ्या एका महिलेने दरवाजा लोटून पाहिले. तेव्हा आतून कडी लावलेली होती. आवाज दिल्यानंतरही काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने परिसरातील रहिवाश्यांनी तोफखाना पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी कॉन्स्टेबल मनोज ससे व पथक दाखल झाले. तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. 

त्यामुळे पोलिसांनी दरवाजा तोडण्याचा निर्णय घेतला.तेवढ्यात घरातून अशोक गिते हा तरूण बाहेर आला.त्याच्या स्वेटरवर रक्ताचे डाग पडलेले होते. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने समाधानकारक उत्तर न दिल्याने पोलिसांनी घर व पाठीमागील बाजूस पाहणी केली. मात्र तेथे कोणीच आढळून आले नाही.

घराच्या ओट्यालाच खेटून असलेल्या टपरीचे झाकण उघडून पाहिले असता. दत्तात्र गिते यांचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. पोलिसांनी तात्काळ अशोक याला ताब्यात घेतले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला. 

दत्तात्रय यांच्या डोक्यात व चेहऱ्यावर टणक वस्तूने मारहाण केल्याचे प्रथमदर्शनी दिसत होते. ते सायकल रिपेरिंगचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत होते. मात्रत्यांचा मुलगा अशोक त्यांना काही दिवसांपासून त्रास देत असल्याचे शेजारी व नातेवाईकांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.