शिर्डी जिल्हा करून आ. कोल्हेंना पालकमंत्री करण्याची मागणी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळाने सर्वात मोठा आहे. त्‍याचे विभाजन गरजेचे असताना हा प्रश्न कुरघोडीच्या राजकारणात भिजत पडला आहे. आता साईशताब्दी वर्ष ही योग्य वेळ आहे. तेंव्हा शिर्डी जिल्हा घोषित करा आणि आमदार स्नेहलता कोल्हे यांना पहिल्या महिला पालकमंत्री करून साई शताब्दी वर्षाची साईभक्तांना भेट द्या, अशी मागणी माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
प्रसिद्धीपत्रकात पाटील यांनी म्हटले की, राहाता तालुका झाल्यानंतर शिर्डी राहात्यात गेली. तालुक्याचे वैभव गेले. आज शिर्डी असो की कोपरगाव, बाजारपेठा ओस पडल्या. व्यावसायिकांना चिंता व कर्जाने घेरले आहे. कोपरगाव, राहाता या दोन्ही तालुक्यांना गत वैभव मिळवून देण्यासाठी शिर्डी जिल्हा होणे ही काळाची गरज आहे. शिर्डी कॉर्पोरेशनच्या माध्यमातून विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध होतील. व्यावसायाला चालना मिळेल. या दूरगामी परिणामांचा नेत्यांनी राजकारणविरहीत विचार करून कोपरगाव व राहाता तालुक्यांना उर्जितावस्था प्राप्त करून द्यावी.

जिल्हा म्हणून लागणारे विमानतळ, रेल्वे स्टेशन, बसस्थानक, साई सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, आत्मा मालिक, प्रवरा यासारखी सुविधायुक्त रुग्णालये, शैक्षणिक क्षेत्रात प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, संजीवनी शैक्षणिक संस्था, साईनाथ आयटीआय, रयत संस्था, खासगी संस्था असे शैक्षणिक जाळे आहे. हे पाहाता जिल्ह्यासाठी आवश्यक सर्व प्रकारच्या संस्था आहेत.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
शिर्डी- कोपरगावच्या मध्ये शासकीय कार्यालयासाठी शेती महामंडळाची मुबलक जागा आहे. पाणी उपलब्ध आहे. साईबाबांमुळे व्हीआयपींच्या ये-जा सुरू राहील व सर्व प्रकारच्या सुविधा तातडीने उपलब्ध होतील. नेवासा, श्रीरामपूर, संगमनेर, अकोला, राहुरी या सर्वांना समान अंतरावर आहे.

कोपरगाव व राहाता या दोन्ही तालुक्यात नव्या जिल्ह्यासाठी फारसा खर्च येणार नाही. शताब्दी वर्षात विविध सुविधांसाठी केलेल्या खर्चामुळे जिल्ह्यासाठी वेगळा खर्च करण्याची गरज लागणार नाही. शिर्डी जिल्हा होण्यात कोणालाही अडचण असण्याचे कारण नाही. गतिमान विकासासाठी छोटे जिल्हे करणे भाजपचा अजेंडा आहे.

जागतिक ख्यातीचे तीर्थक्षेत्र असलेली शिर्डी लोकसभा मतदारसंघ झाला आहेच, आता आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोपरगाव व शिर्डी रेल्वेस्टेशन, जिल्हा न्यायालये, शैक्षणिक संस्था, साखर कारखाने, काश्मीर ते कन्याकुमारी अशी देशाची दोन टोके जोडणारा महामार्ग, होऊ घातलेला नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, भारताच्या कुठल्याही राज्यात जाण्याची सहज व जलद दळणवळण व्यवस्था, नगर, नाशिक, औरंगाबाद, धुळे, जळगाव, पुणे या जिल्ह्यांच्या मध्यवर्ती आहे. 

तेंव्हा साई शताब्दी महोत्सवाचे औचित्य साधून शिर्डी जिल्हा घोषित करण्यात यावा व नव्या जिल्ह्याच्या पहिल्या महिला पालकमंत्री म्हणून आमदार कोल्हे यांना सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.