अकोल्यात विजेची तार अंगावर पडून एकाचा मृत्यू.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अकोले तालुक्यातील इंदोरी शिवारातील एका शेतात विजेची तार अंगावर पडून एक इसम मृत्युमुखी पडल्याची दर्दैवी घटना घडली आणि त्यानंतर उसालाही आग लागली. मरण पावलेल्या इसमाचे नाव नवनाथ तुकाराम मेंगाळ (वय ३५, रा.रुंभोडी) असे असून या आठवड्यातील विजेची तार पडून ऊस जळाल्याची ही आठवी घटना आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
यासंदर्भात समजलेली माहिती अशी की, आज शनिवारी सकाळी ११.१५ च्या सुमारास प्रविण बाबुराव नवले (सर्व्हे नं.३३), लता नानासाहेब हासे (सर्व्हे नं.३६) यांच्या शेतात ऊस विलग करण्याचे काम सुरु असताना अचानक विजेची तार मयत नवनाथ मेंगाळ यांच्या अंगावर पडली आणि उसालाही आग लागली.

यामुळे साडेचार एकर क्षेत्रातील सुमारे १५० टन ऊस जळाला. या ठिकाणी वीज पडून ऊस जळण्याची ही चार वर्षातील ही सलग चौथी घटना आहे. यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या इसमाची पत्नी ही दोन वर्षापूर्वी जळून मरण पावली आहे. त्याला दोन मुले असून ती लहान आहेत. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
उसाला आग लागताच अगस्ती कारखान्याचे अग्नीशामक बंब तातडीने दाखल झाले. त्यांनी आग आटोक्यात आणली. दरम्यान कारखान्याचे ऊस विकास अधिकारी सयाजी पोखरकर यांनी भेट देवून पाहणी केली. या आठवड्यात निंब्रळ, विठा, रायते, रुंभोडी, कळस, आगर, कोतुळ या ठिकाणी विजेच्या तारा पडून ऊस जळाल्याच्या घटना घडल्या आहेत. 

याबाबत विजवितरण कंपनीने लक्ष घालण्याची गरज असून जीर्ण झालेल्या अनेक वर्षापासूनच्या या तारा बदलण्याची गरज असून आज इंदोरीत झालेली घटना दुर्दैवी असून यात दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी अगस्ती कारखान्याचे संचालक राजेंद्र डावरे यांनी केली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.