दरोड्याच्या तयारीत असलेली ६ जणांची टोळी जेरबंद.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा शहराच्या दिशेने मोटारसायकलवरुन दरोडा टाकण्याच्या इराद्याने शसस्त्र टोळीतील ६ जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफिने नगर-दौंड रस्त्यावर पारगाव फाटा येथे जेरबंद केले. मात्र पोलिस पाहताच दोघेजण पळून जाण्यात यशस्वी ठरले. अटक केलेल्याकडून तलवार, कटावणी, मिरचीची पूड, मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त केला आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
याबाबत पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथक गुरुवारी, दि. २ रात्री विविध गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपींचा श्रीगोंदा भागात शोध घेत असताना गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने नगर-दौंड रस्त्यावर पारगाव फाट्याजवळ नियोजन बध्द सापळा रचून श्रीगोंद्याच्या दिशेने मोटारसायकलवरुन दरोडा टाकण्याच्या इराद्याने जाणाऱ्या ७ ते ८ जणांपैकी ६ जणांना मोठ्या शिताफिने अटक केली तर इतर दोघेजण पोलिस पाहताच पळून जाण्यात यशस्वी झाले.

अटक केलेल्यामध्ये ताच्या पाच्या भोसले (रा.सैनिकनगर, डेअरी फॉर्मजवळ, भिंगार) संदेश ताज्या भोसले (भिंगार), संजय युवराज काळे (रा. भिंगार), तपेश किरण भोसले (रा. धानोरा, ता.आष्टी, जि. बीड), सुरेश किफावत काळे (रा. नांदगाव शिंगवे, ता. नगर) आणि जिन्या नाज्या भोसले (रा. नांदगाव शिंगवे, ता. नगर) यांचा समावेश आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

त्यांच्याकडून एक तलावार, एक लोखंडी कटावणी, चार तोंडाला बांधण्याचे मास्क, दोन मिरची पूड, दोन मोटारसायकल असा एकूण ४० हजार २२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. तर यावेळी पोलिस पाहताच शम्र्या हुरमास काळे (रा सय्यदमीर लोणी, ता. आष्टी, जि. बीड) आणि तुषार सावत्या भोसले (रा. कामगाव, ता. नगर) हे दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. याबाबत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात भादवि ३९९-४०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिलीप पवार, सपोनि संदीप पाटील, पोहेकॉ फकीर शेख, सुनील चव्हाण, नानेकर, पो.ना. विजयकुमार वेठेकर, रविंद्र कर्डिले, मनोहर गोसावी, माल्लिकार्जुन बनकर, दिंगबर कारखिले, विजय ठोंबरे, पोकॉ सचिन अडबल, सागर सुलाने यांनी परिश्रम घेतले. अधिक तपास श्रीगोंदा पोलिस करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.