जलयुक्त शिवारामुळे नगरमध्ये सर्वाधिक थंडी - प्रा. राम शिंदे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राज्यातील सर्वांत कमी तापमानाची नोंद नगर शहरात होत आहे. त्यामागे 'जलयुक्­त शिवार' योजनेतून झालेली कामांचे कारणमीमांसा पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केली. जलयुक्त शिवारांच्या कामांमुळे भूगर्भातील पाणीसाठ्यात सर्वाधिक वाढ झाली आहे. जलसाठे भरून आहेत. त्यामुळे किमान तापमानाची राज्यात सर्वात नीचांकी नोंद होत असल्याचा दावा त्यांनी केला. त्याचप्रमाणे कर्जमाफीचे सर्वाधिक लाभार्थी नगर जिल्ह्यातीलच असल्याचे सांगितले. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
जिल्हाधिकारी कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. प्रा. शिंदे म्हणाले, 'कर्जमाफी योजनेत जिल्ह्याची हिरवी यादी प्राप्त झाली आहे. तीत तीन हजार ३४६ लाभार्थी आहेत. त्यांना १८ कोटी ११ लाख रुपयांची कर्जमाफी मिळू शकते. या यादीतील लाभार्थींचे निकष तपासून, कर्जमाफीचा लाभ मिळणाऱ्यांची शेतकऱ्यांची संख्या सोमवारी (ता. ६) जाहीर केली जाईल.'
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

शिंदे म्हणाले, 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या (शनिवारी) राळेगणसिद्धीच्या दौऱ्यावर येत आहेत. तेथे ते मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजनेचे भूमिपूजन करतील. तसेच, राळेगणसिद्धी परिसरातील पाणलोटक्षेत्र विकासाच्या कार्यक्रमाची पाहणी करतील. सौरकृषी वाहिनीमुळे महानिर्मिती मंडळाचे युनिटमागे चार रुपये वाचणार आहेत. राळेगणसिद्धी व यवतमाळ जिल्ह्यातील कोळंबी येथे दोन मेगावॉट वीजनिर्मिती त्यातून होणार आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.