मनोरुग्ण महिलेचा मृतदेह विहिरीत आढळला.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील नंदा संपत राहाणे (वय ४३) या मनोरुग्ण महिलेचा मृतदेह विहिरीत आढळून आला. शुक्रवार दि. ३ नोव्हेंबर रोजी दुपारी ही घटना उघडकीस आली. याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की नंदा राहाणे ही महिला चंदनापुरी याठिकाणी राहत होती. ती मनोरुग्ण असल्याने तिच्यावर औषधोपचारही सुरु होते. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
ती गुरुवार दि. २ नोव्हेंबर रात्रीपासून घरातून बेपत्ता होती. त्यामुळे तिच्या घरच्यांनी तिचा शोध सगळीकडे घेतला. शुक्रवारी दुपारी शोध घेत असताना तिच्या चपला त्यांच्याच विहिरीच्या वर मिळून आल्या. त्यानंतर तिचा मृतदेह विहिरीमध्ये मिळून आला. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

याबाबत वसंत एकनाथ खर्डे (रा. रायते, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या खबरीवरुन तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक गोकुळ औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार रफिक खान हे करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.