त्या महिला रूग्णासाठी आमदार राहुल जगताप धावून गेले सिव्हील हॉस्पिटलमध्ये.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :आज आमदार राहुल जगताप हे नगर मध्ये आले असताना पुष्पा अशोक गरूड, मु.पो.कोळगांव, ता.श्रीगोंदा यांचा हात मोडला म्हणून सिव्हील हॉस्पिटल अहमदनगर येथे पंधरा दिवसांपासून अॅडमिट झाल्या होत्या परंतु तेथील डॉक्टर व स्टाफ त्यांना मदत करत नसल्याची माहिती एका कार्यकर्त्याने सांगितली.


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
त्यांना दोन ते तीन वेळा ऑपरेशन थिएटरमधून बाहेर काढले गेले. प्रत्येक वेळी वेगवेगळे कारण सांगितले जायचे. याची दखल कोणीही घेत नव्हते. हे सर्व त्या कुटूंबातील प्रमुखांनी आज सकाळी आमदार राहुल जगताप यांना सांगितले.

ही माहिती समजताच आमदार जगताप यांनी लगेच सिव्हील हॉस्पिटल मध्ये धाव घेतली व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बुरूटे,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.गाढे व सर्व स्टाफ बोलावून याप्रकाराबाबत खडे बोल सुनावले व त्वरीत उपचार चालू करण्यास सांगत दोन दिवसांच्या आत ऑपरेशन करण्याच्या सुचना दिल्या. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
यावेळेस आमदार राहुल जगताप यांच्या समवेत कुकडी सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन विश्वासराव थोरात, माजी जिल्हा परिषद सदस्य हेमंत सर नलगे, कुकडी कारखान्याचे मा.संचालक मच्छिंद्र नलगे, युवक राष्ट्रवादी जि.उपाध्यक्ष अमित लगड, नितीन आण्णा डुबल, शरद झरे आदी उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.