जामखेड, तुझा मंत्र्यांवर भरोसा नाय का ?

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाय का या गाण्याच्या धरतीवर जामखेड मधील स्वप्नील खाडे या तरुणाने जामखेड च्या नागरी समस्यांवर भाष्य करणार एक गाण तयार केल असून सध्या युट्यूब, व्हाॅट्सअॅपवर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------

मंत्र्यांच्या कारभाराचा झाला सारा झोल झोल. मोर्चे,आंदोलने लई झाले काल काल..अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचा लई झाला झोल झोल आता तरी होईल की नाही पोल खोल असे म्हणत टीकाही करण्यात आली आहे.

महिलांना सार्वजनिक शौचालय आहे का ?, जामखेड तुला कुकडीचे पाणी येईल काय ?, आता तरी तुझा विकास होईल का ? असा सवाल ह्या गाण्यात आहे. एकंदरच जामखेड च्या नागरिकांचा नाराजीचा सूर या गाण्यातून स्पष्टपणे व्यक्त केला आहे.

व्हिडीओ पहा पुढील लिंकवर जामखेड, तुझा मंत्र्यांवर भरोसा नाय का ?
महिलांना सार्वजनिक शौचालय आहे का ?
जामखेडचे रस्ते कसे लांब लांब
ट्राफिकने जीव झाला जाम जाम.

रस्त्याचे खड्डे कसे ? गोल गोल
मंत्र्यांच्या कारभाराचा झाला सारा झोल झोल
रस्त्यावरच्या धुळीने डोळे झाले लाल लाल
मोर्चे,आंदोलने लई झाले काल काल ..

जामखेड तुला कुकडीचे पाणी येईल काय ?
तुझा आता तरी विकास होईल का ?
जामखेड, तुझा मंत्र्यांवर भरोसा नाय का ?
अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचा लई झाला झोल झोल
आता तरी होईल की नाही पोल खोल

जामखेड, तुझा मंत्र्यांवर भरोसा नाय का ?

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.