लोकसभेच्या निमित्ताने जिल्ह्याच्या रणसंग्रामात डॉ. सुजय विखे उतरणार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर लोकसभा मतदारसंघातून डॉ. सुजय विखे पाटील यांनी लढण्याची तयारी सुरू केली आहे. तशी घोषणाच त्यांनी राहाता येथील एका कार्यक्रमात केली. लोकसभेच्या निमित्ताने जिल्ह्याच्या रणसंग्रामात डॉ. सुजय विखे उतरणार आहेत. डॉ. सुजय विखे यांनी आपली भूमिका जाहीर केल्याने जिल्ह्याच्या राजकारणाला आता वेगळे वळण मिळणार आहे. 


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
राजकारणाचे सर्व डाव वापरणार 
आगामी विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीसाठी विखे कुटुंबातून दोन उमेदवार लढणार आहेत. विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आपल्या मुलासाठी राजकारणाचे सर्व डाव वापरणार असल्याने जिल्ह्यातील धुरिणांचे डोळे विस्फारले आहेत. 

माझ्या दाढीचे केस पांढरे होऊ लागले
राहाता येथील गणेश कारखान्याच्या कार्यस्थळावर शेतकरी व कार्यकर्त्यांशी बोलताना डॉ. सुजय विखे यांनी आपली ही भूमिका मांडली. शिर्डी विधानसभा मतदार संघ, गणेश, विखे व तनपुरे साखर कारखाने, मुळा-प्रवार वीज संस्था, नगर येथील विखे फाउंडेशनची जबाबदारी आपण एकाच वेळी यशस्वीपणे सांभाळत आहोत. त्यामुळे माझ्या दाढीचे केस पांढरे होऊ लागले आहेत, असे ते म्हणाले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
मतदार संघात युवा कार्यकर्त्यांची पेरणी 
नगर जिल्ह्याच्या राजकारणात विखे पाटील यांचे सर्व तालुक्‍यात लक्ष असते. आपले कार्यकर्ते जिल्हाभर पेरून ठेवण्यात त्यांनी यश मिळविले आहे. त्यांचे पुत्र डॉ. सुजय नगर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी करणार असल्याचे संकेत विविध कार्यक्रमानिमित्ताने मिळत होते. डॉ. सुजय विखे यांनी मागील दोन वर्षांपासून नगर लोकसभा मतदार संघात युवा कार्यकर्त्यांची पेरणी केली. इतर लहान-मोठ्या निवडणुकांत कॉग्रेसच्या वतीने सभांना त्यांची हजेरी असे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.