धार्मिक स्थळांवरील दुस-या टप्प्याच्या कारवाईत आणखी पाच मंदिरे हटवली.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत धार्मिक स्थळांवरील दुस-या टप्प्याच्या कारवाईत आणखी पाच मंदिरे हटविण्यात आली. गुरुवारी रात्री ११.३० वाजता कारवाईला सुरूवात होऊन पहाटेपर्यंत कारवाई करण्यात आली. 


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
बालिकाश्रम रस्त्यावरील शितळादेवी मंदीर, ओबेरॉय हॉटेल शेजारील हनुमान मंदिर, हुंडेकरी शोरुमसमोरील लक्ष्मीआई मंदिर, भिस्तबाग चौकातील म्हसोबा मंदिर व प्रोफेसर कॉलनीतील शिवमंदीर अशी पाच मंदिरे कारवाई करून हटविण्यात आली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
मनपाच्या पथकातील विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोहिमेकडे पाठ फिरविली. त्यामुळे उपस्थित असलेल्या इतर कर्मचाऱ्यांनाच जीव धोक्यात घालून विद्युत तारांची, पुरवठा खंडीत करण्याची कामे करावी लागली.यावेळी दंगल नियंत्रण पथकासह मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यामुळे कारवाई शांततेत पार पडली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.