अजून सरकारला कर्जमाफीचा झालेला गोंधळ कळाला नाही - आ.थोरात

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मागील तीन वर्षांत भाजपाने शिवसेनेची खूप अवहेलना केली आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी कायम जनतेच्या बरोबर राहाण्याची भूमिका ठेवली होती; मात्र अवहेलनेनंतरही सध्याची शिवसेना सत्तेबरोबर राहते तरी कशी? त्यामुळे केंद्रात व राज्यात भूलथापा देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारच्या विरोधात जनतेच्या मनात प्रचंड असंतोष निर्माण झाला असल्याची टीका आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
सरकारच्या तीन वर्षांच्या कामकाजाबाबत माध्यमांशी बोलताना आ. थोरात म्हणाले, केंद्र व राज्य सरकारचे गोरगरीब, शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिक यांच्या विरोधात धोरण आहे. ढिसाळ कारभारासह कोणतेही विकास काम होत नसल्याने भाजप सरकार सर्वच क्षेत्रात अपयशी ठरले आहे. सरकारच्या तीन वर्षांच्या काळात संपूर्ण जनता असमाधानी आहे. कोणतेही ठोस काम झाले नाही.

शेतीमालाला भाव नाही. सरकारने सोयाबीनची खरेदी केलेली नाही. कांदा व तूर या पिकांबाबत हीच परिस्थिती आहे. उलट पेट्रोल व डिझेलचे भाव वाढवून ठेवले आहेत. या सरकारची प्रशासनावर कोणतीही पकड नसल्याने मागील तीन वर्षांत शेतकऱ्यांना वीजबिलेसुद्धा दिली नाहीत आणि आता थोडेफार पीक पाण्याचे दिवस आले, तर सर्वत्र अचानक वीज कट केली आहे. अगदी महानगरांमध्येही भारनियमन असून सर्वत्र विजेचा खेळखंडोबा झाला आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

काही ठिकाणी अतिवृष्टी झालेली असताना साधा पंचनामासुद्धा केला नाही. मागील तीन वर्षे विविध मोर्चाचे राहिले. अनेक संप, आंदोलने या सरकारच्या काळात झाली. सर्वत्र रस्त्यांवर खड्डेच- खड्डे निर्माण झाले असून अडीच लाख कोटी रुपये उभारलेले कर्ज गेले तरी कुठे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 

याउलट काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या. आता जनतेला नक्कीच काँग्रेसच्या कारभाराचे कौतुक वाटत आहे. कर्जमाफीबाबत मोठा गोंधळ झाला असून मोठ्या जाहिराती नंतर कुणालाही कर्जमाफी मिळाली नाही. अजून सरकारला कर्जमाफीचा झालेला गोंधळ कळाला नाही असेही ते म्हणाले. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.