शेवगावमध्ये साथीच्या आजारांनी नागरिक त्रस्त.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शेवगाव नगरपरिषद हद्दीतील सर्वच प्रभागांत कचरा संकलन कामाचा बोजवारा उडाला असून, कचरा साचल्यामुळे शहरात साथीच्या आजारांनी अनेक नागरिक त्रस्त झाले आहेत. कचरा संकलनासाठी नवीन घंटागाडया खरेदी कराव्यात अथवा त्या बाह्यस्त्रोतातून उपलब्ध कराव्यात, अशी मागणी प्रशासनाकडे वारंवार करूनही प्रशासन व पदाधिकाऱ्यांना याचे गांभीर्य नाही. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
त्यामुळे यापुढे परिषदेच्या सर्वसाधारण सभेवेळी शहरातील सुजान नागरिकांसह घंटानाद आंदोलन करण्याचा तसेच ' स्वच्छ शेवगाव, आपला अधिकार असे निरंतर आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक महेश फलके यांनी दिला आहे.

याबाबत नगरसेवक फलके यांनी परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, शहरातील कचरा संकलनाबाबत प्रशासन व पदाधिकारी अतिशय बेजबाबदार, मोघम व असंवेदनशील भूमिका घेताना दिसत आहेत. आरोग्य व घनकचरा व्यवस्थापनासाठी राखीव असलेल्या कोटयवधी रुपयांचा निधी दीड वर्षापासून शिल्लक आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

 या निधीचा वापर करावा, अशी मागणी आपण १५ मार्च व १४ ऑगस्ट २०१७ रोजी लेखी स्वरुपात केलेली आहे. तसेच मासिक सभेतही त्याबाबत आवाज उठविलेला आहे. नागरिकांची सहनशिलता आता संपत चाललेली आहे. कचरा उचलण्यासाठी तत्काळ गरजेपुरत्या घंटागाडया विकत किंवा कंत्राटी तत्वावर घेऊन कचरा संकलनाचे काम सुरळीतपणे करा. या कामात दिरंगाई झाल्यास शहरातील नागरिकांसह आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे.

शहरात ग्रामपंचायत असतानाच्या काळात २००८ साली दोन घंटागाडया विकत घेण्यात आल्या होत्या. त्याच आज नगरपरिषद वापर आहे. सदर घंटागाडया कालबाह्य झाल्याने वारंवार नादुरुस्त होतात. त्यांच्या व देखभाल व दुरुस्तीवर आतापर्यंत सुमारे दोन लाख रुपये खर्च झालेला आहे. 

१४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून कचरा संकलनासाठी नवीन घंटागाडया विकत घेण्याचा प्रस्ताव मी मांडला होता. तो ठरावही परिषदेने संमत केलेला आहे. तरीही घोडं कुठं पेंड खातयं, असा प्रश्न माझ्यासह सामान्य नागरिकांना पडला आहे, असे नगरसेवक महेश फलके म्हणाले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.