जवखेडे हत्याकांडातील आरोपींकडून पोलिसास शिवीगाळ आणि दमदाटी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जवखेडे हत्याकांडातील आरोपींनी पोलिसाची गचांडी पकडून भिंतीवर ढकलत शिवीगाळ दमदाटी करत एकाने स्वत:चे डोके दरवाजावर आपटून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना जिल्हा सत्र न्यायालयात बुधवारी (दि.१) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
याबाबतची माहिती अशी की, जवखेड हत्याकांडाची न्यायालयात सुनावणी सुरु असून न्यायालयीन कामकाजाकरिता बुधवारी (दि.१) जिल्हा सत्र न्यायालयात या गुन्ह्यातील दिलीप जगन्नाथ जाधव, अशोक दिलीप जाधव, प्रशांत दिलीप जाधव (तिघे रा.सबजेल कारागृह) या तीन आरोपींना आणले.

न्यायालयातील लॉकअपमध्ये आरोपींना आणल्यानंतर पोलिसांनी कायदेशीररित्या त्यांची अंगझडती घेतली असता आरोपींना राग येवून त्यांनी पो.हेका. निसार शेख (नेमणूक पोलिस मुख्यालय) यांना तुम्ही आमच्या अंगाला हात लावू नका, असे म्हणून मोठमोठ्याने आरडाओरड करून शेख यांची गचांडी धरुन त्यांना भिंतीवर ढकलून दिले आणि सरकारी कामात अडथळा आणला. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

तसेच दिलीप जाधव याने स्वत:चे डोके दरवाजावर आपटून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिसांना शिवीगाळ करून दमदाटी केली.याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांनी हेकॉ.निसार शेख यांच्या फिर्यादीवरुन गुन्ह्याची नोंद केली असून, अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास देशमाने हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.