काटा मारलेला आढळला तर आमदारकीचा राजीनामा - आ.राहुल जगताप.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कुकडी सहकारी साखर कारखान्याचा १५ वा गळीत हंगाम सर्व अडचणींवर मात करून यशस्वी करून दाखवू, असा विश्वास आमदार तथा चेअरमन राहुल जगताप यांनी व्यक्त केला. ते कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभप्रसंगी बोलत होते. आत्मा मलिक माऊली कोकमठाण आचार्य यांच्या हस्ते गव्हाणीत उसाची मोेळी टाकून गळीत हंगामाचा शुभारंभ आज करण्यात आला. यंदा प्रथमच कुकडीचे संस्थापक कै.कुंडलिकराव तात्या जगताप यांच्या निधनामुळे त्यांच्याशिवाय हा गळीत हंगाम होणार आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
आ.जगताप म्हणाले, कारखान्याचा सद्या सर्वात कठीण काळ आहे. आतापर्यंत स्वत:च्या उत्पादनावर कारखाना चालत होता. आता उत्पादन कमी आणि खर्च जास्त झाला आहे. कारखान्याचे विस्तारीकरण आणि को-जनरेशन प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी यावर्षी ४ ते ५ लाख मे.टन उसाचे गाळप होणे आवश्यक आहे. तरच कर्जावरील व्याज, पतसंस्थांकडून घेतलेल्या ठेवींचे व्याज परतफेड करणे शक्य होणार आहे.

शेतकरी बांधवांनी आपला ऊस कारखान्यास देऊन सहकार्य करावे. अन्य कारखाने जो दर देतील त्याप्रमाणे आम्ही दर देण्यास कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. अडचणींवर मात करून कारखान्याला उर्जितावस्था आणण्याचा प्रयत्न करू, यासाठी सर्व संचालक मंडळ, कर्मचारी व सभासदांचे सहकार्य आवश्यक असल्याचे सांगितले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

विस्तारीकरणानंतर प्रथमच यावर्षी कारखान्याला पूर्ण क्षमतेने गाळप करावयाचे आहे. जादा दिवस कारखाना चालला तर कर्जफेड, कामगारांचा पगार वेळेत देणे शक्य होणार आहे. शेतकऱ्यांनी या कारखान्यास ऊस द्यावा व कामगारांनी आतापर्यंत जसे सहकार्य केले आहे तसे यापूढेही करावे.अशीही विनंती केली. तसेच कारखान्या बाबत विविध चर्चा करणाऱ्यांचा आ.जगताप यांनी चांगलाच समाचार घेतला. 

आत्मा मलिक माऊली कोकमठाण आचार्य यांचे शिष्य परमानंद देवानंद महाराज बोलताना म्हणाले की, आ.जगताप यांना जनतेने साथ देणे हीच कै.कुंडलिकराव जगताप यांना श्रद्धांजली ठरेल, त्यामुळे जनतेने त्यांना साथ द्यावी. 

काटा मारलेला आढळला तर आमदारकीचा राजीनामा .
कुकडी सहकारी साखर कारखाना काटा मारतो, अशी कारखान्याचे हितचिंतक कायम चर्चा करताना दिसतात. त्यांना आमदार जगताप यांनी आव्हान दिले आहे की, जर कुकडी कारखाना काटा मारताना आढळून आला, तर नुसत्या कारखान्याचे चेअरमनपद नाही तर आमदारकीचाही राजीनामा देऊ. असे विरोधकांना ठणकावून आव्हान दिले आहे..
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.