जनतेच्या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी कॉंग्रेस च्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा - अमित देशमुख.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केंद्रातील व देशातील भाजप सरकार विरोधात जानेतेच्या मनात प्रचंड असंतोष असून त्याला वाचा फोडण्यासाठी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा असे मत आ.भा.कॉंग्रेस कमिटी चे सचिव व माजी मंत्री आ.अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी चे सरचिटणीस विनायकराव देशमुख यांनी काल बाबुळगाव (लातूर) येथे आ.देशमुख यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली त्यावेळी आ.देशमुख यांनी हे मत व्यक्त केले.


---------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी 
फेसबुक पेजला लाईक  https://www.facebook.com/ahmednagarlive24 करा.
----------------------
विनायकराव देशमुख हे महाराष्ट्र राज्य एस.टी.कामगार कॉंग्रेस च्या राज्य कार्यकारणीच्या बैठकीसाठी लातूर येथे आले होते. श्री देशमुख यांनी लातूर महानगरपालिका निवडणुकीचे निरीक्षक म्हणून आ.अमित देशमुख यांच्या समवेत काम केले आहे,तसेच आ.देशमुख हे गोवा राज्याचे प्रभारी असून विनायकराव देशमुख यांनी आ.अमित देशमुख यांच्या सहकार्याने गोव्यातील संघटनात्मक निवडणुका नुकत्याच यशस्वीपने नुकत्याच पार पाडल्या आहेत.

संतोषाला वाचा फोडण्यासाठी कॉंग्रेस कार्यकर्त्यानी पुढाकार घ्यावा

यावेळी बोलताना आ.अमित देशमुख गेल्या ३ वर्षांतील कारभाराने केंद्रातील आणि राज्यातील सरकारबाबत जनतेचा मोठा भ्रमनिरास झाला आहे,भाजप नेत्यांच्या खोट्या आश्वासनामुळे जानेतेच्या मनामध्ये फसवलो गेल्याची भावना निर्माण झाली आहे. GST द्वारे झालेली राक्षसी कर आकारणी व नियोजनशून्य नोटबंदीचा निर्णय यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला असून व्यापार - उद्योग मोडकळीस आले आहेत,नोकर्यांमध्ये होणारी कपाट,कर्जमाफी बाबत चा गोंधळ, धर्माच्या नावावर केले जाणारे राजकारण,शेतकर्यांच्या आत्महत्या,आदी बाबींमुळे सामान्य जनतेच्या मनामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे,या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी कॉंग्रेस कार्यकर्त्यानी पुढाकार घ्यावा ,असे आवाहन यावेळी आ.अमित विलासराव देशमुख यांनी केले.

राज्याच्या अनेक भागातून,आपणांस भेटीचे निमंत्रणे आले असून आगामी हिवाळी अधिवेशनानंतर आपण राज्याच्या विविध भागांत दौरा करणार असल्याचे आ.अमित देशमुख यांनी सांगितले .

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.