अखेर महापालिकेने 'कायनेटिक; कंपनी काढली लिलावात !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :३ कोटी ३३ लाख ४८ हजार रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने कायनेटिक इंजिनिअरिंग कंपनी  लिलावात काढली आहे. कंपनीची मालमत्ता महापालिकेने आधीच जप्त केली होती. मात्र मालमत्ता जप्त करूनही थकबाकी न भरल्याने महापालिकेने सहा डिसेंबरला कंपनीचा लिलाव काढण्याचा निर्णय घेतला आहे.


महापालिकेने सध्या मालमत्ताकराच्या थकबाकी वसुलीसाठीची मोहीम तीव्र केली आहे. शहरातील कायनेटिक कंपनीकडे महापालिकेची साडेतीन कोटी रुपयांची कराची थकबाकी आहे. यासाठी महापालिकेने आधी कंपनीला नोटीस दिली. त्यानंतर दिवाळीपूर्वीच कंपनीच्या आयटी विभागाला सील ठोकून मालमत्ता जप्त केली. 

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

त्यानंतर कंपनीच्या व्यवस्थापनाने जिल्हा न्यायालय आणि औरंगाबाद खंडपीठात अपील दाखल केले. कंपनीचे दोन्हीही अपिल फेटाळण्यात आले. त्यानंतर महापालिकेने जप्त मालमत्तेचा लिलाव करण्याचा अखेर निर्णय घेतला. त्यानुसार सहा डिसेंबर ही तारीख महापालिकेने जाहीर केली आहे. या लिलावात सहभाग घ्यायचा असेल तर त्यासाठी पाच डिसेंबरपर्यंत लिलावात सहभागी होता येणार आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Blogger द्वारा समर्थित.