गेल्या तीन वर्षांत कोपरगाव तालुक्‍याचा विकास हरवला आहे - आशुतोष काळे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :माजी आमदार अशोक काळे यांनी १० वर्षांत कोणाताही भेदभाव न करता सर्वत्र समान विकासाचे धोरण ठेवले. विकासाचा डोंगर उभा केला; मात्र गेल्या तीन वर्षांत तालुक्‍याचा विकास हरवला आहे. कोणी काम केले, नाही केले, यापेक्षा आपण काय करणार, हे घेऊन जनतेत जाऊ. विधानसभेच्या निवडणुका लागतील तेंव्हा लागतील; पण निवडणुकीच्या तयारीला आतापासूनच लागा, असे आवाहन कर्मवीर काळे कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी केले. 
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याच्या ६३व्या गळीत हंगामाचा शुभारंभ काल आशुतोष काळे व जिल्हा बॅँकेच्या संचालक चैताली काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आशुतोष काळे बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोक काळे होते.

आशुतोष काळे म्हणाले, या वर्षीचा गळीत हंगाम कमी झाल्यामुळे कारखान्यास तोटामुक्त करता आले नाही; परंतु चालू गळीत हंगामात कारखान्याला तोटामुक्त करण्याचा प्रयत्न आहे. चालू हंगामात कार्यक्षेत्रातून ३.२५ लाख मे. टन व कार्यक्षेत्राबाहेरून २.२५ लाख मे. टन ऊस उपलब्ध आहे. ५.५० लाख मे. टन उसाच्या गाळपाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले असले, तरी सहा लाख मे. टन ऊस गाळप होईल, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. 

एफ.आर.पी.प्रमाणेच साखरेलासुद्धा किफायतशीर व हमीभाव निर्धारित करण्याची जबाबदारी केंद्र सरकारने घेतली पाहिजे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने परिषदेत काढलेला दर दक्षिणेकडचा आहे. त्याची तुलना व स्पर्धा इकडे होऊ शकत नाही. गत हंगामात आम्ही दरापेक्षा १३८ रुपये विशेष प्रोत्साहनपर अनुदान दिले. भावात भेदभाव केला नाही. शुगर कंट्रोल ॲक्‍टमुळे साखर कमी भावात विकावी लागते. यावर्षी २ लाख मेट्रीक टन साखर १५० ते २०० रुपये कमी दराने विकावी लागेल. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

१४ दिवसाला पेंमेंटच्या अटीमुळे दररोज पेमेंट करावे लागेल. ते व्यावहारिक नसून अडचणीचे ठरणार आहे. तोडणीला काही रक्‍कम विक्रीनंतर टप्प्याने रक्‍कम अदा करण्याची आपली पद्धत गुजरातमध्ये राबविली जात आहे; मात्र ही पद्धत महाराष्ट्रात बंद करण्यात आली, हे अन्यायकारक व अडचणीचे आहे. 

ईशान्येकडे ताग पिकतो म्हणून इकडे २० टक्‍के साखर बारदान घेण्याची सक्‍ती. पॉलीथीन व बारदान दरात मोठी तफावत आहे. तो फटका कारखानदारीला बसत आहे. भरीस भर म्हणून ऊस नियंत्रण मंडळाने ऊस वहातूक अंतराचे स्लॅब पाडून दर ठरवल्याने भावात पडणाऱ्या तफावतीमुळे असंतोष भडकण्याची शक्यता आहे. 

आपण समान भाव देतो. कारखानदारीसाठी हवाई अंतराचे बंधन काढल्याने खासगी कारखाने उभारले जातील. घरगुती वापराच्या साखरेचा भाव व औद्योगिक वापराच्या साखरेचा दर वेगळा ठेवावा, अशी मागणी त्यांनी केली. सरकारच्या साखर काराखानदारी धोरणामुळे नवनवी आव्हाने उभी राहात आहेत. आज सहकाराला बळ देण्याची आवश्यकता आहे. २-३ वर्षाचा तोटा याच हंगामात भरून काढू आणि पुढच्या वर्षी नवे काहीतरी करू. सर्वांचे सहकार्य हवे, असे आवाहन त्यांनी केले. 

केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आहे. लोकप्रतिनिधी सत्ताधारी पक्षाच्याच आहेत. लोकांचे प्रश्न सोडविण्याचा कळवळा दाखवू नका, सोशल मिडीयावरून जनता बोलायला लागली आहे. गाळप हे राजकीय व्यासपीठ नाही. तरीही सरकारविरोधी सुर म्हणजे बदलाचा वेगळा विचार तर नाही ना ? असा मिश्किल सवाल त्यांनी शेवटी केला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.