निघोज-अळकुटी रस्त्याची दुरवस्था.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पारनेर तालुक्‍यातील निघोज – शिवडी – अळकुटी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याची तातडीने दुरूस्ती न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी सरपंच संजय लामखडे यांनी दिला.--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
लामखडे यांनी रस्त्याच्या दयनीय अवस्थेबाबत सांगितले की, निघोज शिवडीमार्गेअळकुटी हा रस्ता अनेक वर्षांपासून खराब झाला आहे. हा रस्ता जवळचा मार्ग म्हणून वाडीवस्तीवरील लोक, ग्रामस्थ या रस्त्याचा वापर करतात. या जवळच्या मार्गालगत काही लहान गावे आहेत.

 या भागातील जनता शेतीने सधन आहे. शेतमाल जवळच्या मार्गाने अळकुटी, आळेफाटा, कल्याणमार्गे मुंबई मार्केटमध्ये पोहोच करता येतो. या दृष्टीने हा जवळचा मार्ग उपयुक्‍त आहे. कित्येक वर्षांपासून या भागातील जनतेने रस्त्याच्या दुरूस्तीसाठी पाठपुरावा केला, परंतु संबंधित खात्याचे अधिकारी व लोकप्रतिनिधी आमच्या मागणीकडे काना डोळा करतात, असा आरोप लामखडेंनी केला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.