"सर्वज्ञा कराळे पाटील" फॅन्सी ड्रेस स्पर्धेत प्रथम

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कै. बाई ईचरजबाई फिरोदिया आंतरशालेय फॅन्सी ड्रेस स्पर्धेत सेंट विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कुलची विद्यार्थिनी सर्वज्ञा अविनाश कराळे पाटील ही प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाची मानकरी ठरली. सप्टेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत सर्वज्ञा अविनाश कराळे पाटील हिने पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारी आदिवासी समाजातील साळू हि व्यक्तीरेखा साकारली होती. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
सदरील स्पर्धेसाठी प्रसिद्धी नाट्यलेखिका मदुरा झावरे आणि नाट्यकर्मी सागर मेहेत्रे यांनी परीक्षक म्हणून काम पहिले होते. आजपर्यंत सर्वज्ञाने अनेक स्पर्धांमधून अभिनयाची प्रथम क्रमांकाची पारितोषिके मिळविली आहेत. सर्वज्ञा हि नगरमधील प्रसिद्ध नाटयकर्मी व दैनिक लोकसत्ताचे व्यवस्थापक अविनाश कराळे पाटील यांची कन्या आहे. तिच्या या यशाबद्दल अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, रंगकर्मी प्रतिष्ठान, संघर्ष युवा प्रतिष्ठान आदी संस्थांच्यावतीने तीचे अभिनंदन करण्यात आले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.