अवैध वाळू उपसा न थांबल्यास तहसील कार्यालयात पेढे वाटप

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पारनेर तालुक्‍यातील अवैद्यरित्या सुरू असलेल्या वाळू उपशाबाबत विविध गावच्या तक्रारींबद्दल तत्काळ अंमलबजावणी होण्यासह विविध मागण्यांचे निवेदन पारनेर तहसीलदार यांना सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे, सचिन शेळके यांनी दिले आहे. या मागण्यांची अंमलबजावणी न झाल्यास गांधीगिरीमार्गाने पारनेर तहसील कार्यालयात पेढे वाटपाचे अनोखे आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
निवेदनात म्हटले आहे की, पारनेर तालुक्‍यातील बेसुमार वाळू उपशाबाबत संबंधित गावातील ग्रामस्थांनी पारनेर तहसील, जिल्हाधिकारी यांना वेळोवेळी निवेदन देवूनही कारवाईस टाळाटाळ केली जात असल्याने गावोगावच्या नदी व ओढ्यांचे पात्र संपुष्टात आले आहे. यामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत चालला आहे. चालू वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस होऊनही नधी व ओढ्यांच्या खड्ड्यांमुळे पाणी पातळी प्रचंड प्रमाणात खालावली आहे. वाळू वाहतुकीने रस्त्यांची चाळण झाली असून जागोजागी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
प्रशासनाने ओढ्याचे, नदीचे व रस्त्यांचे खड्डे तत्काळ बुजवावे, वाळू उपशाविरोधात आवाज उठवणाऱ्यांना पोलीस संरक्षण मिळावे. प्रशासनाने याबाबत वेळीच कार्यवाही न केल्यामुळे गावोगावी ओढ्यांची, नद्यांची व रस्त्याची दुरावस्था निर्माण झाली. त्याचबरोबर या अवैद्यधंद्यांकडे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात वळल्याने गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. अवैध वाळू उपशास पाठबळ देणाऱ्या अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी, अन्यथा आठ दिवसानंतर पारनेर तहसील कार्यालयामध्ये गांधीगिरी मार्गाने पेढे वाटप आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.