फाशीनंतर पुढे काय ?

दैनिक महाराष्ट्र टाईम्स :- कोपर्डी प्रकरणातील दोषींना जिल्हा व सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली असली तरी फाशीची अंमलबजावणी लगेच होत नाही. फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीसाठी उच्च न्यायालयाकडून निकालावर शिक्कामोर्तब व्हावे लागते. तसेच आरोपींना सर्वोच्च न्यायालयात जाता येते, राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करता येतो. त्यासाठी अनेक महिने, वर्षांचा कालावधी जाऊ शकतो, अशा माहिती या क्षेत्रातील जाणकारांनी दिली.


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
कोपर्डीतील घटना घडल्यानंतर सोळा महिन्यानंतर या खटल्याचा निकाल लागला आहे. जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ, नितीन भैलुमे या तिघांना फाशीची शिक्षा झाली. सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली असली तरी या शिक्षेवर उच्च न्यायालय शिक्कामोर्तब करत असते. तसेच आरोपींना या शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालयात अपिल करता येते. या दोन्ही प्रक्रिया एकाचवेळी होतात.

फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करणे, अपिलावर निर्णयासाठी उच्च न्यायालयात सहा महिन्यांचा कालावधी जातो. फाशीच्या शिक्षेत अनेक आरोपी उच्च न्यायालयात अपील करत असतात, असे विधीतज्ज्ञ अॅड. सतीशचंद्र सुद्रिक यांनी सांगितले. या खटल्यात जितेंद्र शिंदेला विधी सेवा प्राधिकरणाकडून सरकारी खर्चाने वकील देण्यात आला होता. तर इतर दोघांनी स्वतःच्या खर्चाने वकील दिले होते. उच्च न्यायालयात अपिल करण्यासाठी नियमाप्रमाणे विधी सेवा प्राधिकरणाकडून सरकारकडून वकिलाची मदत करता येते.

उच्च न्यायालयाने फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यानंतर या विरुद्ध आरोपींना सर्वोच्च न्यायालयातही अपिल करता येते. सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा कायम केल्यास राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करता येतो. राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करणे हा न्याययंत्रणेचा भाग नाही. तो राष्ट्रपतींचा विशेषाधिकार असतो. राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केल्यानंतर राष्ट्रपती कार्यालयाकडून आरोपी संदर्भातील अहवाल व राज्याचा अभिप्राय मागविला जातो. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अभिप्रायानंतर राष्ट्रपती दयेच्या अर्जावर निर्णय देतात. ही प्रक्रिया पार पाडल्यानंतर आरोपींना प्रत्यक्ष फाशी दिली जाते. यासाठी अनेक वर्षांचा कालावधी जात असतो. यापूर्वी फाशीच्या शिक्षेची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत, तर ज्यांची अंमलबजावणी झाली, त्यालाही दीर्घ काळ लागला, असे विधीतज्ञ्ज सांगतात.

कोपर्डी खटल्यात तिन्ही आरोपींना फाशी झाल्यानंतर विशेष सरकारी वकील निकम लढत असलेल्या खटल्यांत फाशीची शिक्षा झालेल्या आरोपींची संख्या ४४ झाली आहे. तर ६२५ जणांना जन्मठेप झाली आहे. १९९३ पासूनचे हे खटले आहेत. त्यात आतापर्यंत मुंबई बॉम्बस्फोटातील याकूब मेमन, दहशतवादी अजमल कसाब यांच्या फाशीची अंमलबजावणी झाली आहे.

तोपर्यंत 'सरकारी पाहुणेच'!

या खटल्यात फाशीसोबतच जन्मठेप आणि इतरही शिक्षा देण्यात आल्या आहेत. फाशीची शिक्षा प्रत्यक्षात यायला तर वेळ लागणार आहेच, शिवाय अन्य शिक्षांनाही अपिलाची मुदत संपेपर्यंत (सहा महिने) स्थगिती असते. त्यामुळे तोपर्यंत आरोपी तुरूंगातच असतात.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.