दरोडा व खून प्रकरणातील चारजण श्रीगोंद्यात जेरबंद.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सातारा जिल्ह्यातील कराडमधील उंब्रज बाजारपेठेत सुहेल अल्ताभ मुल्ला यांच्या बंगल्याचे दरवाजा तोडून सुहेल यांची आजी जैबून करीब मुल्ला (वय 86) यांचा जागीच खून करून त्यांचे अंगावरील 30 तोळे सोने 4 लाख 93 हजार 500 रुपयाचे लुटून पोबारा केलेल्या शशिकांत उर्फ काळ्या दशरथ भोसले (रा.मांडवगण), अतुल दप्तर्या भोसले (रा. वडघुल), देवराम उर्फ देवा घोगरे (रा.मांडवगण सर्व रा.श्रीगोंदा) तर दर्शन दशरथ चव्हाण (रा.परमपूरवाडी ता.नगर) यांना दोन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर 26 रोजी रात्री अटक करून मोटारगाडी देखील जप्त केली. या आरोपींना सातारा पोलिसांच्या ताब्यात दिले असून या कारवाईचे तालुक्‍यातून कौतूक होत आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
याबाबत अधिक माहिती अशी की, दि 21 नोव्हेंबर रोजी पहाटे 11:45 वाजता फिर्यादी सोहेल मुल्ला यांच्या उंब्रज येथील बंगल्याच्या मागील दरवाजा तोडून आत झोपीत असणाऱ्या जैबून मुल्ला यांना जबर मारहाण करीत त्यांचा खून करून त्यांचे अंगावरील 30 तोळे सोने लुटून हे दरोडेखोर पसार होण्यात यशस्वी झाले होते. हे आरोपी श्रीगोंदा येथील असल्याचा सुगावा सातारा पोलीसांना लागला होता.

त्यानुसार हे पथक दि. 25 रोजी श्रीगोंदा येथे आले. पोलीस उपाधीक्षक सुदर्शन मुंढे यांचे सूचनेवरून आणि पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक महावीर जाधव, गुन्हेगारांना अचूक शोधणारा मास्टर माईएन्ड पोलीस हवालदार अंकुश ढवळे, पोलीस कॉ उत्तम राऊत, किरण बोराडे आणि सातारा पोलीस यांनी कसून शोध घेऊनवरील आरोपी जेरबंद केले. यातील देवराम घोगरे याच्या मालकीची इनोहो गाडी क्रमांक एम यच 43 पी 5423 ही गाडी गुन्ह्यात वापरली होती ती गाडी आणि आरोपी घोगरे यास ताब्यात घेऊन सातारा पोलिसांच्या हवाली केले.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.