तरुणांनी समाजाच्या प्रश्नासाठी लढावे - माजी खा.गडाख.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सुजाण, सुसंस्कृत नवीन पिढी तयार होण्याची आज गरज असून तरुणांनी समाजाचे प्रश्नासाठी लढले पाहिजे. आम्ही राजकारण करत असताना संस्थाही काढल्या आणि तळ हाताच्या फोडाप्रमाणे जोपासल्या. राजकारण करत बसलो नाही, तर आम्ही रोजगार निर्मिती केली, असे प्रतिपादन माजी खासदार जेष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांनी केले.

--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
माजी खासदार ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व प्राचार्य डॉ. अशोक शिंदे यांचा सेवापूर्ती निमित्त सत्काराचे आयोजन श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले होते. त्याप्रसंगी गडाख सत्काराला उत्तर देतांना बोलत होते.

 ज्येष्ठ साहित्यिक व गीतकार प्रा. प्रवीण दवणे, श्री ज्ञानेश्वर मंदिर विश्वस्त हभप शिवाजी महाराज देशमुख, महंत सुनीलगिरी महाराज, हभप उद्धव महाराज, माजी आमदार दौलत पवार, यश ग्रुपचे अध्यक्ष प्रशांत गडाख, मुळा साखर कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, बाजार सामिचीचे चेअरमन कडूबाळ कर्डिले, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष विठ्ठल लंघे, उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, उपस्थित होते. प्रारंभी ज्येष्ठ नेते गडाख व माजी प्राचार्य डॉ. अशोक शिंदे यांचा महाविद्यालायाच्या वतीने प्राचार्य डॉ. गोरक्षनाथ कल्हापुरे यांच्या हस्ते गौरवचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.

यशवंतराव गडाख म्हणाले, विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत आहे. पण रोजगार मिळवून देण्यात विद्यापीठ अपयशी ठरली आहे. ज्ञानेश्वर महाविद्यालयाची निर्मिती प्रथम संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर येथे पंचायत राजचे निर्माते यशवंतराव चव्हाण व स्व. बन्सी महाराज तांबे यांच्या उपस्थित ज्ञानेश्वर मंदिरात बैठक झाली. 

यावेळी स्वत: यशवंतराव चव्हाण यांनी एक हजार रुपयांची देणगी दिली. आणि तेथून पुढे मदतीचा ओघ सुरू झाला. आज या महाविद्यालयात हजारो मुले-मुली शिक्षण घेत आहे. त्यामुळे आम्ही काहीतरी समाजासाठी काम केल्याचे समाधान वाटते आहे. तरुणांनी समाजाचे प्रश्नासाठी लढले पाहिजे. 

शिक्षण संस्था तसेच सहकारी संस्था आता तरुण पिढीच्या हातात दिल्या आहेत आणि ते चांगल्या पद्धतीने जपतायत. सर्वांच्या कष्टाने सोनई व नेवासे येथील महाविद्यालयांना 'अ' मानांकनाचा दर्जा मिळाला. स्व. यशवंतराव चव्हाण, स्व. वसंतदादा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे शिकवणीनुसार मी काम करत राहिलो. मी अनेक संकटावर मात करत मी पुढे जात राहिलो.

डॉ. अशोक शिंदे म्हणाले, ज्या महाविद्यालयात शिकलो त्याच महाविद्यालयात नोकरीला लागलो आणि तेथेच प्राचार्य झाल्याने माजी विद्यार्थी ते प्राचार्य या प्रवासाने मी धन्य झालो असून मला ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनीच संधी दिल्याने मी साहित्यिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात चांगले काम करू शकलो. गडाखांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला मी पात्र ठरल्याचा मला अभिमान आहे. यावेळी माजी आमदार दौलतराव पवार, कवी प्रवीण दवणे यांनी आपले विचार मांडले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.