शिर्डी संस्थानच्या नवीन विश्वस्तांचा आज फैसला.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या नवीन विश्वस्त मंडळाचा बुधवारी (दि.२९) हायकोर्टात फैसला होईल. विश्वस्त मंडळाविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. मंगेश पाटील यांच्या खंडपीठाने यापूर्वी जुलै महिन्यात याचिका निकालासाठी राखीव ठेवली होती. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे याचिकेवर निकाल सुनावण्यात येणार आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
विश्वस्त निवडताना सुस्पष्ट अशी नियमावली तयार करण्यात यावी, असे आदेश यापूर्वीच्या एका याचिकेवरील निर्णयात उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले होते. विश्वस्त नियुक्तीसाठी नियम तर बनविण्यात आले, परंतु त्यात खूपच संदिग्धता ठेवण्यात आली.

नियम अस्पष्ट आहेत. यामध्ये विश्वस्त निवडीसाठी निकषही निश्चित करण्यात आलेले नाहीत. ही नियमावली पुरेशी स्पष्ट नाही, संदिग्ध असल्याचा आरोप करत संदीप विजय कुलकर्णींसह इतरांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती. शासनाने शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान मंदिराच्या विश्वस्तांची नव्याने नियुक्ती केली.

 २८ जुलै २०१६ रोजी यासंबंधीची अधिसूचना सरकारने जाहीर केली. त्यानाराजीने सामाजिक कार्यकर्ते सचिन गोपाळराव भांगे, दिलीप बोरधारे, सुरेंद्र आरोरा, संजय काळे व नवनीत पांडे यांनी नव्याने नियुक्त केलेल्या विश्वस्त मंडळाविरोधात व अधिसूचनेला हायकोर्टात आव्हान दिले होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.