‘नगर अर्बन’कडून बोगस कर्ज वाटप.

दैनिक महाराष्ट्र टाईम्स :नगरमधील नगर अर्बन को-ऑप. मल्टिस्टेट-शेड्युल्ड बँकेने सहा डॉक्टरांच्या नावाने परस्पर कर्ज वाटप केल्याचे प्रकरण पुढे आले आहे. कोट्यवधी रुपयांचे हे बेकायदेशीर कर्जप्रकरण आहे. या प्रकरणी संबंधित डॉक्टरांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार या प्रकरणाची पोलिस चौकशी करीत असून, संबंधितांच्या जाबजबाबाचे काम सुरू असल्याचे सांगितले जाते.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
यासंदर्भात एका डॉक्टरने नगर अर्बन बँकेच्या संचालकांना पत्रही पाठवले आहे. त्यानुसार मिळालेली माहिती अशी की, येथील डॉ. नीलेश शेळके यांनी भागीदारीत एम्स हॉस्पिटल सुरू करण्याचे ठरविले होते. त्यात सहा डॉक्टर हे भागीदार होते. या हॉस्पिटससाठी मशिनरी खरेदी करण्यासाठी बँकांकडून लोन घेण्याचे ठरले होते. त्यासाठी डॉ. शेळके यांनी कर्जासाठी डॉक्टरांकडून अर्ज भरून घेतला होता.

त्यानंतर त्यांच्याकडून एका सहकारी बँकेचे कोरे धनादेश घेतले गेले. परंतु शेळके यांच्या कुटुंबिक कारणामुळे हे हॉस्पिटल सुरू होऊ शकले नाही. त्यामुळे मशीन खरेदी केल्या गेल्या नाहीत, असे या डॉक्टरांचे म्हणणे आहे. आम्ही नगर अर्बन बँकेकडून कर्ज घेण्यासाठी अर्ज केला नव्हता. तसेच कर्ज मंजूर केल्याचे पत्रही तक्रारदारांना मिळाले नव्हते. डॉ. शेळके यांना कर्जवाटप करण्यात आले होते, अशी तक्रार या डॉक्टरांनी पोलिसांकडे केली आहे. पोलिसांकडे ही तक्रार होण्यापूर्वी या डॉक्टरांनी बँकेकडून कर्जवाटपाबाबत माहिती मागितली होती. 

परंतु त्यांना कुठलीच माहिती देण्यात आली नसल्याचे समजते. त्यामुळे संबंधित डॉक्टरांनी पोलिसांसह या बँकेचे सर्व संचालक, सहकार मंत्री व जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रार केलेली आहे. पोलिसांकडे आलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणातील एका डॉक्टरांच्या नावावर तब्बल सुमारे ८ कोटीचे कर्ज घेतले गेले असल्याचे समजते. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Powered by Blogger.