आंतरजातीय विवाह केल्याने मामाने भाचीला केली मारहाण !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :भाचीने परस्पर आंतरजातीय विवाह केल्याने मामाने रागाच्या भरात भाचीस बेदम मारहाण केली. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
याबाबत सविस्तर माहिती अशी की, २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वा जामखेड शहरातील मेनरोडवरील एका जनरल स्टोअर्ससमोर आरोपीची भाची तिच्या नणंदेसह उभी होती. त्यावेळी आरोपीने भाचीच्या नणंदेचा हात पकडत ‘तुझ्या भावाने माझ्या भाचीला पळवून नेले आहे, आता मी तुला पळवतो’, असे म्हणत ओढले. तसेच दोघींनाही मारहाण केली. त्यानंतर दोघींनी रात्री जामखेड पोलीस ठाणे गाठून आरोपीविरोधात फिर्याद दिली.

संबंधित तरुणीचे जामखेड शहरातील एका तरुणावर प्रेम होते. दोघांनीही आळंदीला जाऊन आंतरविवाह केला. २१ जून रोजी दोघांनीही नोंदणी पद्धतीने विवाह केला. त्यानंतर संबंधित आरोपी वारंवार मुलाच्या नातेवाईकांना धमकी देत होता. त्याच्या धमकीला कंटाळून भाचीच्या सासरच्या लोकांनी संबंधित आरोपीविरोधात जामखेड पोलीस ठाण्यात यापूर्वीही तक्रार देण्यात आली होती. 

रविवारी आरोपीने भाचीसह तिच्या नणंदेलाही मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपी फरार असून, पुढील तपास पोलीस उपाधिक्षक सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल बी. आय. गव्हाणे हे करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.