वाळू तस्करांकडून महसूल पथकाला मारहाण.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील मुळा नदीपात्रात तिघा वाळू तस्करांनी महसूल विभागाचे मंडळाधिकाऱ्यांच्या पथकाला शिविगाळ व दमदाटी करत त्यांच्या ताब्यातील दोन ट्रॅक्टर व ढंपर पळवून नेल्याची घटना शनिवार दि. २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तिघा तस्करांविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पांडुरंग साहेबराव गागरे, सुदाम भास्कर खामकर, राहुल साहेबराव गागरे हे तिघे रा. मांडवे खुर्द, ता.पारनेर येथील असून ते शनिवारी सायंकाळी तालुक्यातील मांडवे बुद्रुक याठिकाणी मुळा नदीपात्रात दोन ट्रॅक्टर व एक हायवा ढंपरमध्ये बेकायदेशीररित्या वाळू भरत असल्याची माहिती साकूरचे मंडळाधिकारी बाळासाहेब दगडू कोकणे यांना गुप्त खबऱ्यामार्फत समजली. त्यामुळे त्यांच्या पथकाने त्या ठिकाणी जावून ट्रॅक्टरसह ढंपर ताब्यात घेतला आणि ते घेवून घारगाव पोलिस ठाण्याकडे येत होते.  त्याच दरम्यान या तिघाही वाळू तस्करांनी त्यांना रस्त्यात अडवून धक्काबुक्की, शिविगाळ, दमदाटी केली व त्यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर व ढंपर पळवून नेले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Blogger द्वारा समर्थित.