बिअरबार बंदीचा निर्णय बदलतो, मग मंदिरांचा का नाही ?

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :न्यायालयाने आजपर्यंत अनेक अध्यादेश काढले मात्र त्यांचा एवढा तंतोतंत अंमलबजावणी झाली नाही. पाचशे मीटर परिसरातील सर्व बिअरबार बंदकरण्याचा आदेशही सवार्ेच्च न्यायालयाचा होता. काय झाले या आदेशाचे. धाब्यावर बसून आज सर्व बिअरबार सर्रास चालू आहेत. मात्र शक्ती स्थळे असलेले आपली मंदिरे पडण्याच्या मोहिमेच्या वेळी कायद्यावर बोट हे अधिकारी ठेवत आहेत. मंदिरांबाबतचा निर्णय का बदलला जात नाही? असा सवाल जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहास मुळे यांनी उपस्थित केला.

--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी मंदिर बचाव कृती समितीतर्फे शहरात ठिकठिकाणी सभा घेण्याच्या उपक्रमास सुरवात केली आहे. या अंतर्गत समितीची दुसरी सभा पुना रोडवरील कायनेटिक चैकातील रविश कॉलनी येथील सिद्धिविनायक गणपती मंदिरा जवळ झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी सुहास मुळे होते. यावेळी मंदिर बचाओ कृती समितीचे निमंत्रक वसंत लोढा, सदाशिव शिंदे, श्रीशिव प्रतिष्ठानचे जिल्हा कार्यावह बापू ठाणगे, बाळासाहेब भुजबळ, कैलास दळवी, शशिकांत देशमुख, राजकुमार जोशी, प्रल्हाद चौधरी आदी उपस्थित होते.

मुळे म्हणाले, 'महापालिकेने हाती घेतलेली शहरातील मंदिरे पडण्याची मोहीम ही सवार्ेच्च कोर्टाच्या आदेशाचा अपमान करणारी आहे.' मनपाच्या अधिकाऱ्यांनी आपली बुद्धी गहाण ठेऊन चुकीच्या पद्धतीने शहरातील धार्मिक स्थळांचा सव्र्हे केला. त्यामुळे वाहतुकीस अडथळा नसणारेही मंदिरे पाडली आहेत. हिंदूंच्या मंदिरांवर आलेली ही आपत्ती इष्टापट्टी समजून सर्व हिंदूंनी एकत्र येण्याची ही वेळ आली आहे. सर्व शक्तीपणाला लाऊन आपली मंदिरे वाचव, असे ते म्हणाले.

वसंत लोढा यांनी रविश व सरस कॉलनीमधील नागरिकांनी रुपया-रुपया गोळा करून लोकवर्गणीतून एवढे सुंदर व मोठे मंदिर उभारले आहे. कॉलानीच्या मोकळ्या जागेत असेलेल हे गणपती मंदिर वाहतुकीस कोणताही अडथळा ठरत नाही. मनपाच्या चुकीच्या सव्र्हेमुळे या मंदिराला नोटीस बजावण्यात आली. मात्र मंदिर बचाओ कृती समिती आता शहरातील एकही मंदिर पडू देणार नाही. हिंमत असेल, तर प्रशासनाने आम्हाला थांबून दाखवावे. सर्व भाविकांच्या पाठबळावर या करवाईला विरोध करत राहू, असे ते म्हणाले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.