तालुकाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कर्जत - जामखेड विधानसभा मतदारसंघातून अजित पवार हे निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिल्याने, सहा महिन्यांपासून रिक्त असलेल्या जामखेड राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरु झाली आहे.यासाठी जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय वारे, साकतचे माजी सरपंच हनुमंत पाटील, माजी जि.प.सदस्य प्रा.मधुकर आबा राळेभात, माजी जि.प.सदस्य शहाजी राळेभात, माजी चेअरमन प्रदीप पाटील, यांनी यासाठी जोरदार फिल्डींग लावली आहे.

--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
जि.प व पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. सत्तेत असताना पदाधिकाऱ्यांनी जनतेकडे पाठ फिरवल्याने यावेळी पराभवास सामोरे जावे लागले. या निवडणुकीपासून राष्ट्रवादीला तालुक्यात कोणताच जनाधार नसल्याने पक्षात मोठी मरगळ पाहावयास मिळत आहे. त्यातच मागील काही महिन्यांपासून पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र कोठारी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने पक्ष संघटनाच कोमात गेल्याचे चित्र होते.

मात्र राशीन येथील कार्यक्रमात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जत जामखेड मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी आग्रह धरला असून, या बाबत विचार करून निर्णय घेतला जाईल असे संकेत दिल्याने कार्यकर्त्यांत चैतन्याची लहर आली. याच लहरींतून पक्षाच्या तालुकाध्यक्षपदाच्या निवडीच्या प्रक्रियेने उचल खाल्ली अन् अनेकांनी अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे..

साकतचे माजी सरपंच हनुमंत पाटील यांनी युवकांची फळी मजबूत केली आहे. राजकारणात नेहमी निर्णायक भूमिका,यामुळेच ते लवकरच तरुण वर्गाची फळी घेऊन ना.पवार यांची भेट घेणार आहेत. प्रचंड जनसंपर्कामुळे पाटील यांना तालुका अध्यक्षपद मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहे. 

तसेच माजी जि.प.सदस्य प्रा.मधुकर राळेभात यांनी २००९च्या विधानसभा निवडणुकीत चांगलीे मते मिळाली होती. त्यामुळे त्यांना तालुक्यातील जनतेशी जवळीकता आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. जिल्हा उपअध्यक्ष दत्तात्रय वारे यांनी पक्षाची ताकद वाढविण्यासाठी कायम प्रयत्नशील असल्याने व वजनदार नेते व कार्यकर्त्यांची भक्कम फळी उभी केली आहे. माजी जि.प.सदस्य शाहजी राळेभात यांचाही मोठा संपर्क आहे व तरुण पिढी त्यांना मानणारी आहे. सर्वजन या पदासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे पक्ष श्रेष्ठी जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.