2,500 बेरोजगार युवकांना मिळाली एकाच दिवशी नोकरी

दैनिक दिव्य मराठी :पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या संकल्पनेतून पार पडलेल्या पोलिस पाल्य पारधी समाजातील मुला-मुलींच्या नोकरी मेळाव्यात एकाच दिवशी तब्बल हजार ५४० बेरोजगारांना नोकरी मिळाली. मेळाव्यात नाशिक परिक्षेत्रातील तब्बल हजार २०० मुला-मुलींनी सहभाग नोंदवला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते मेळाव्याचे उदघाटन झाले. त्यानंतर मेळाव्यात सहभागी ५२ मल्टीनॅशनल कंपन्यांनी उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांना नियुक्तीपत्र दिले.


--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार नगरमधील पोलिस पाल्य पारधी समाजाच्या मुला-मुलींसाठी जिल्हा प्रोलिस प्रशासनाने न्यू आर्टस् महाविद्यालयाच्या मैदानावर रविवारी नोकरी मेळाव्याचे आयोजन केले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते मेळाव्याचे उदघाटन झाले. याप्रसंगी पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा, पारधी समाजाचे नेते प्रा. किसन चव्हाण, अप्पर पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील, सहायक पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे, नोकरी मेळाव्याचे आयोजक किरण रहाणे, ग्रामीणचे नूतन सहायक पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया आदी उपस्थित होते.

गुन्हेगारी जात, असा शिक्का बसलेल्या पारधी समाजाच्या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या संकल्पनेतून नाशिक जिल्ह्यातील परिक्षेत्रासाठी नगरमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला. या मेळाव्यात पोलिसांच्या मुलांनाही सहभाग घेतला. पोलिस पाल्य पारधी समाजाच्या हजार २०० मुलां-मुलींनी मेळाव्यात सहभाग घेतला.

मल्टीनॅशनल ५२ कंपन्यांनी सहभागी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यापैकी हजार ५४० मुला- मुलींची नोकरीसाठी निवड करण्यात आली. पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या हस्ते ८० उमेदवारांना नियुक्तीपत्रदेखील देण्यात आले. केवळ नाशिक परिक्षेत्रच नव्हे, तर राज्यभरातील पोलिस पारधी समाजातील मुला-मुलींनी मेळाव्यात सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे सहभागी सर्व मुलांना वर्षभरासाठी एक जॉब कार्ड मोफत देण्यात आले. ज्या मुलांना मेळाव्यात नोकरी मिळाली नाही, अशांना या कार्डच्या माध्यमातून वर्षभर नोकरीचा शोध घेता येणार आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.