काँग्रेसच्या 'युवानेत्यांच्या 'फ्लेक्सबाजीने पंडित जवाहरलाल नेहरू यांचा पुतळा झाकला !



अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अहमदनगर शहरातील मार्केटयार्ड मुख्य प्रवेशद्वारामधे भारताचे पहिले प्रधानमंत्री मा.पंडित जवाहरलाल नेहरू यांचा अर्धाकृती पुतळा आहे. त्यांच्या जयंती पुण्यतिथीला कृषी उत्पन्न बाजार समितीकडून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जाते.


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ सुजय विखे यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छाचा फ्लेक्स इथे लावण्यात आला आहे. राज्यभरातील शेतकरी बाजार समितीत येत असताना या पुतळ्याला अभिवादन करतात. रा.स्व.संघ व भाजपाचे ट्रोल्स काँग्रेसच्या पंडित नेहरू व कुटूंबियांची विविध प्रकारे सोशल मिडीयावर बदनामी करत असल्याचे आपण पहातो परंतु काँग्रेस पक्षाचे नव्या पिढीचे पुढारी व त्यांचे कार्यकर्ते जर पुतळ्याच्या सन्मानाकडे दुर्लक्ष करत असतील तर हि गोष्ट काँग्रेसमुक्त भारत या घोषणेला बळ देणारी ठरणार तर नाही ना ? हि शंका येते.

(छायाचित्र - कॉम्रेड भैरवनाथ, इंजी.अभिजीत एकनाथ वाघ)

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.