काँग्रेसच्या वतीने मा.मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी संपन्न

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माजी मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
यावेळी ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ,उत्तर महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक सेलचे उपाध्यक्ष मुन्नासेठ चामडेवाले,भिंगार काँग्रेस महिलाध्यक्षा मरागरेट जाधव,युवक काँग्रेसचे अज्जूभाई , हारून इनामदार, प्रेमानंद पाडळे ,सुभाष रणदिवे,सुनीता साळवी,मयूर पाटोळे ,अड नरेंद्र भिंगारदिवे,सागर कदम,ऋषिकेश शिंदे,शुभम शिर्के आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

दीप चव्हाण म्हणाले यशवंतराव चव्हाणांच्या कणखर भूमिकेमुळे देशाच्या राजकारणात महाराष्ट्राचे नाव आहे,त्याच्यामुळे आर्थिक राजधानी मुंबई महाराष्ट्रात आली, त्याच्यामुळेच महाराष्ट्राची निर्मिती झाली,महाराष्ट्राच्या विकासासाठी ते झटणारे ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. राष्ट्राच्या मदतीला सह्याद्री धावला हे त्यामुळेच त्यांना म्हटले जाते.सर्वात विश्वासू , निष्ठावंत म्हणून ते दिल्लीच्या राजकारणात परिचित होते.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
श्री भुजबळ म्हणाले स्व यशवंतराव चव्हाण हे जेवढे कणखर होते तेवढेच साहित्यिक हि होते. त्यांचाकडे साहित्यिक,गायक आपली कला सादर करीत असे, ते कला व क्रीडा क्षेत्रातील लोकांना ते नेहमी प्रोत्साहन देत असत.सर्व सामान्य जनतेचे ते नेतृत्व करणारे लोकनेते होते.आपल्या कणखर बाण्याने त्यांनी नवमहाराष्ट्र घडविला. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.