स्वरांनी भारावले, कार्यानी पाणावले


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :युवानच्या प्रथेप्रमाणे कार्यक्रमाच्या वेळेआधीच तुडुंब भरलेले सभागृह. अंजली व नंदिनीच्या स्वरांची उत्कट प्रतीक्षा. युवान विद्यार्थी स्वयंसेवकांची शिस्तबद्ध लगबग. शुभेच्छांची देवाण - घेवाण. युवान कार्याचीमाहिती देणारे फलक, आकर्षक हॅन्डमेड पेपर बॅग्जचा स्टॉल. प्रवेशद्वारावर दिव्यांग विद्यार्थिनींनी रंगवलेली आकर्षक रांगोळी. युवान ह्या सामाजिक संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिनानिम्मित नगरकरांना काल संध्याकाळी हे चित्र पाहावयास मिळाले.

अखेर पडदा उघडला आणि सारेगमप लिटील चॅम्प अंजली व संगीत सम्राट नंदिनी गायकवाड यांचे टाळ्यांच्या कडकडात नगरकरांनी उत्स्फूर्त स्वागत केले. पारंपरिक सत्कार, उदघाटन समारंभ यास फाटा देत युवानसंस्थेतील दैनंदिन डॉ. एस. एन. सुब्बाराव यांच्या आवाजातील ‘सर्व धर्म प्रार्थनेने’ कार्यक्रमाचे उदघाटन झाले.

त्यास यथायोग्य साथ देत अंजली व नंदिनीने ‘रघुपति राघव’ हे गांधीजींचे आवडते भजन गात मैफिलीचीसुरवात केली. जय शारदे, ओम नमः शिवाय या भक्तिगीतांनी, दिवस तुझे हे फुलायचे, शूर आम्ही सरदार, दही तूप लोणी या मराठी तर पिया तो से नैना लागे रे, मेरे ढोलना सून, हसता हुआ नूरानी चेहरा या आणि अशासदाबहार गीतांनी अंजली व नंदिनीने मैफिलीला वेगळाच साज चढवला. त्यांचे गुरु व वडील अंगद गायकवाड यांचे संगीत संयोजन लक्षवेधक होते.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
२६/११ च्या स्मृती दिनानिमित्त ‘ए मेरे वतन के लोगो’ हे गीत गात अंजली व नंदिनीने शहिदांना श्रद्धांजली वाहिली. तदनंतर झालेला भारतमातेचा जयघोष प्रत्येकाच्या अंगावर शहारे आणणारा होता.मध्यंतरात युवानच्या सुरज भोसले व वर्षा गवारे या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रत्यक्ष अनुभवातून युवानचे कार्य उलगडून सांगितले. समाजाने कसे नाकारले पण युवानने स्वीकारून कसे घडवले, हे सांगतांना त्यांच्यापाणावलेल्या डोळ्यांच्या कडाच खूप काही सांगून गेल्या.

यावेळी नगरकरांच्या वतीने श्रीमती आशाताई फिरोदिया, प्रतिभाजी धूत, मोहनजी मानधना, डॉ. हेमंत नाईक, ऍड.श्याम असावा, डॉ. सुजाता नरवडे, सुहास रायकर, प्रसन्न पाठक, सुरेश मैड, हेमंत लोहगावकर यांच्या हस्ते अंजली, नंदिनी व गायकवाड दांपंत्याचा विशेष फोटो फ्रेम व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. प्रसिद्ध निवेदक वीणा दिघे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.