नितीन आगे प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जामखेड तालुक्यातील खर्डा येथील बहुचर्चित नितीन आगे या युवकाची प्रेम प्रकरणाच्या संशयावरून हत्या झाली असतानाही सबळ पुराव्या अभावी आरोपींची सुटका झाली. तरी हा तपास सीबीआयकडे देऊन ॲट्रॉसिटी कायदा कडक करावा, हलगर्जीपणा करण्याऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई कारवाई, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नितीनचे वडील ,आंबेडकरी पक्ष संघटना व भीमसैनिकांनी पोलीस उपाधीक्षका सोनाली कदम यांना निवेदनाव्दारे दिला.


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
या निवेदनात म्हटले आहे की ,खर्डा येथील नितीन आगे या युवकाची प्रेम प्रकरणाच्या संशयावरून हत्या झाल्याचा मृताच्या नातेवाईकांचा आरोप आहे. तशी फिर्याद मयताचे वडील राजू आगे यांनी २९ एप्रिल २०१४ साली जामखेड पोलीस ठाण्यात दिली होती.

त्यानुसार आरोपींवर खून व ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. तत्कालीन पोलीस उपधीक्षक धीरज पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास करून दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर प्रकरणातील मयत नितीन आगे याची हत्या केली. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
याचा तपास शासनामार्फत सीबीआयकडे सोपवावा, ॲट्रॉसिटी कायदा कडक करावा व सदरील प्रकरणातील फितूर झालेले साक्षीदार यांची चौकशी करून त्यांच्यावर कार्यवाही व्हावी. या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी. 

अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नितीनचे वडील आंबेडकरी पक्ष संघटना व भीमसैनिकांनी पोलीस उपाधीक्षीका सोनाली कदम यांना दिला आहे. या निवेदनावर राजू आगे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, अरुण जाधव, विकी सदाफुले, विकी घायतडक, सतीश साळवे, संतोष गव्हाळे, बाबा सोनावणे, शिवाजी साळवे, बापूसाहेब गायकवाड, मिलिंद भोसले, सनी सदाफुले, योगेश अब्दुले आदींच्या सह्या आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Blogger द्वारा समर्थित.