रेंज मिळत नसल्याने श्रीगोंदेकर हैराण, सीमकार्डची सामूहिक होळी करणार !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा तालुक्यातील म्हसे, रायगव्हाण, उक्कडगाव, वडगाव या गावांमध्ये सध्या कोणत्याच मोबाईल कंपनीच्या टॉवरची रेंज मिळत नाही. त्यामुळे या भागातील नागरिक चांगलेच संतप्त झाले आहेत. 


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
या भागातील मोबाईलधारक आयडिया, वोडाफोन, बीएसएनएल या कंपनीची सीमकार्ड वापरतात. पण गेल्या काही महिन्यांपासून या कंपनीची रेंजच मिळत नाही. परिणामी सर्वच कामे खोळंबली आहेत. त्यामुळे या गावांमधील ग्राहक चांगलेच वैतागले असून, त्यांना गावातून बाहेर संपर्क करण्यात अडचणी येत आहेत.

मोबाईल सेवा खंडित झाल्यामुळे या परिसरातील सर्वच कामकाज ठप्प झाले आहे.नागरिकांना काही महत्त्वाचे काम असेल तर अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वारंवार याबाबत संबंधित कंपन्यांकडे तक्रार करूनही कुठलीच दखल या घेत नसल्यामुळे या भागातील ग्राहक चांगली सेवा देणाऱ्या कंपनीचा शोध घेत आहेत. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
दुर्गम भागात राहात असल्यासारखे वाटते .
आमच्या भागात मोबाईल सेवा सारखी विस्कळीत होत आहे. त्यामुळे सतत रेंज गायब होते.परिणामी संपर्क करण्यात अडचणी येत आहेत.त्यामुळे आम्हाला सध्या आदिवासी, अत्यंत दुर्गम भागात रहात असल्यासारखे वाटत आहे.तरी त्या कंपन्यांनी तातडीने त्यांची सेवा सुधारावी. अन्यथा आम्ही सर्व गावकरी या कंपन्यांच्या सीमकार्डची सामूहिक होळी करू. - संभाजीराजे दिवेकर/युवा नेते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Blogger द्वारा समर्थित.