घरपट्टी थकवल्याने सरपंचपद रद्द जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अकोले तालुक्यातील लहित बु.च्या सरपंच वर्षा सोमनाथ चौधरी यांनी ग्रामपंचायतीच्या करापोटी घरपट्टी थकविली असून त्यांचे सरपंच पद रद्द करा, अशी तक्रार उपसरपंच लहानू चौधरी यांनी केली होती. यावर जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी होऊन त्यांचे ग्रामपंचायत सरपंचपद (सदस्यत्व) रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी दिले आहे.


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
उपसरपंच चौधरी यांनी २१ जुलै २०१७ रोजी वकिलांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांकडे याप्रश्नी दाद मागितली असता यावर महाराष्ट्र अधिनियम क्र.१४ खंड (ह) च्या तरतुदीचा भंग सरपंचांनी केला आहे, तरी सरपंच वर्षा रामनाथ चौधरी यांचे सरपंच पद रद्द करावे अशी मागणी जिल्हाधिकाऱ्याकडे उपसरपंच चौधरी यांनी केली होती.

या तक्रारीवर दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंचपद (सदस्यत्व) रद्द करण्याचा आदेश दिला आहे. सन २०१५-१६ व सन २०१६-१७ या कालावधीची ग्रामपंचायत कराची घरपट्टी रक्कम रुपये ६ हजार ७९८ रुपये थकविली आहे. ती वेळेत भरलेली नाही.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
पदाचा गैरवापर करीत असल्याचीही तक्रार या तक्रारकत्र्याने केली आहे. प्रति वर्षाची ३ हजार ३९९ प्रमाणे दोन वर्षांची घरपट्टी एकूण ६ हजार ७९८ रुपये ही थकबाकी असून त्या थकबाकी भरण्यास टाळाटाळ करीत आहेत. कोणत्याही ग्रामपंचायत सदस्याकडे ग्रामपंचायत कराची थकबाकी असल्यास व त्याने ती न भरल्यास असा सदस्य ग्रा. प. सदस्यपदी अपात्र ठरतो असा दावाही तक्रारकत्र्याच्या वतीने त्यांच्या वकिलाने केला होता. 

तसेच तक्रारदाराने सरपंचाकडे असलेली थकबाकीचा देखील अहवाल सादर केला होता. यामध्ये ग्रामसेवक यांचेही लेखी म्हणने घेण्यात आले. त्यानंतर हा निकाल देण्यात आला. या निकालावर प्रतिक्रिया घेण्यासाठी वर्षा चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.